घरदेश-विदेश'नव्या अध्यक्षाची निवड करावी' - राहुल गांधी

‘नव्या अध्यक्षाची निवड करावी’ – राहुल गांधी

Subscribe

कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीने कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड करावी अशी माहिती कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकारांना दिली.

”काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मी जबाबदार आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी यापूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी”, असे राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी तात्काळ काँग्रेसच्या पक्ष बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव फेटाळला होता.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान २०१७ साली राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन २५ मे रोजीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र काँग्रेसच्या कार्यकारी समितीने एकमताने त्यांचा राजीनामा फेटाळला. यावेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींची भेट घेऊन राजीनाम्याच्या निर्णयावरुन मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.


हेही वाचा – अमित शाह प्रिय मित्राच्या मुलावर कारवाई करतील?’


ट्विटर अकाऊंटमधून ‘अध्यक्ष’ गायब

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्याची सूचना राहुल गांधींनी पक्षाच्या कार्यकारी समितीला दिली आहे. दरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या नावापुढील ‘काँग्रेसचा अध्यक्ष’ हे पद काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उत येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -