घरदेश-विदेशअबब! 'ही' हत्तीण माऊथ ऑरगन वाजवते!

अबब! ‘ही’ हत्तीण माऊथ ऑरगन वाजवते!

Subscribe

हत्तीण माऊथ ऑरगन वाजवताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? तमिळनाडूची एक हत्तीण माऊथ ऑगरन वाजवते. पाहा व्हिडिओ!

हत्तीणला कधी माऊथ ऑरगन वाजवताना तुम्ही पाहिलं आहे का? तमीळनाडूची एक हत्तीण खरोखरच माऊथ ऑरगन वाजवते. या हत्तीणचे नाव लक्ष्मी असे आहे. या हत्तीणला माऊथ ऑरगन वाजवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. तेकामपट्टी येथील बालन नावाच्या एका व्यक्तीने तिला माऊथ ऑरगन वाजण्याचे प्रशिक्षण दिले आहे. आतापर्यंत माणसाला माऊथ ऑरगन वाजवतना आपण बघितलं आहे, पण हत्तीणला माऊथ ऑरगन वाजवताना आपण पहिल्यांदाच बघत आहोत. या हत्तीणचा माऊथ ऑरगन वाजवण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय म्हणाला बालन?

या हत्तीणचा मालक बालन याने एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “मी या हत्तीणला माऊथ ऑरगन वाजवण्याचे शिकवले आहे. तिला शिकवण्यासाठी मला फार मेहनत घ्यावी लागली. तिने तीन-चार वेळा माऊथ ऑरगन तोडले आहे. तरीदेखील मी थांबलो नाही. तिला सतत प्रशिक्षण देत राहिलो, प्रयत्न करत राहिलो. अखेर ती शिकली.”

- Advertisement -


हेही वाचा – Video: जेव्हा होते २ हत्तींची ‘दंगल’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -