घरदेश-विदेशबिल्डर संजय छाब्रिया, कपिल वाधवान यांच्याविरोधात 150 कोटींच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल

बिल्डर संजय छाब्रिया, कपिल वाधवान यांच्याविरोधात 150 कोटींच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बिल्डर संजय छाब्रिया आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान यांत्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. दीडशे कोटींच्या फसवणूकप्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे.

मुंबईतील महालक्ष्मी येथील पुनर्विकास योजना प्रकरणात हा गुन्हा केला आहे. अद्याप ही पुनर्विकास योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेसाठीचे पैसे छाब्रिया यांच्या फर्म इंडो ग्लोबल सॉफ्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने वाधवानच्या DHFL च्या संगनमताने आपल्या फायद्यासाठी वापर 150 कोटींचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

येस बँक-राणा कपूर प्रकरणी सीबीआयने एप्रिलमध्ये छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान छाब्रियाविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेला तिसरा गुन्हा आहे. गुन्हे शाखेच्या बँकिंग २ युनिटने EOW च्या बँकिंग -2 युनिटने अलीकडे छाब्रिया, वाधवान आणि इतर दोन आरोपींवर कलम 420 (फसवणूक), 406 (गुन्हेगारी विश्वासभंग), 409 (लोकसेवक, किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासार्हतेचा गुन्हेगारी उल्लंघन) आणि भारतीय दंड संहितेच्या १२०-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अलीकडे मुंबईतील विशेष न्यायालयाने ABIL समुहाचे अध्यक्ष अविनाश भोसले यांना DHFL- येस बँक प्रकरणात सीबीआयच्या कोठडी सुनावली होती. भोसले हे पुण्यातील अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एबीआयएल) ग्रुपचे संस्थापक आहेत.  तपासात सीबीआयला असे आढळून आले की, डीएचएफएलला राणा कपूर यांच्या नेतृत्वाखालील येस बँकेकडून काही वर्षांपूर्वी गुंतवणूक म्हणून मिळालेल्या 3,000 कोटी रुपयांचा मोठा भाग रेडियस समूहाकडे वळवण्यात आला होता. 

- Advertisement -

येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) घोटाळा प्रकरणाशी संबंधित फसवणूक प्रकरणी फेडरल एजन्सीने गेल्या महिन्यात शनिवारी पुणे आणि मुंबईतील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्या जागेवर छापे टाकले.

विनोद गोयंका हे DB Realty Ltd चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि शाहिद बलवा हे त्याच समूहाचे उपाध्यक्ष आहेत. ज्याचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. रिअल्टी कंपनीने उपनगरीय मुंबईतील एका निवासी प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी DHFL कडून कर्ज घेतले होते.


Paavo Nurmi Games 2022 : नीरज चोप्राने मोडला स्वत:चाच नॅशनल रेकॉर्ड; पण गोल्ड मेडल हुकले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -