घरदेश-विदेशApple भारतात करणार iPhone 14 चे उत्पादन; कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

Apple भारतात करणार iPhone 14 चे उत्पादन; कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

Subscribe

जगप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple आता भारतात iPhone 14 चे उत्पादन करण्यास उत्सुक आहे. आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी अॅपलने काही दिवसांपूर्वी आयफोनचे नवीन मॉडेल लाँच केले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतात बनवलेल्या iPhone 14 ची पहिली बॅच ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या अखेरीस तयार होऊ शकते, अशी माहिती समोर आली होती. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, Apple भारतात उत्पादन वाढवण्यासाठी पुरवठादारांशी चर्चा करत आहे. यामागे शी जिनपिंग – अमेरिकन सरकारमधील वाद आणि चीनमधील व्यापक लॉकडाऊन ही मोठी भूमिका बजावत आहे.

मार्केट रिसर्च फर्म Techarc च्या अंदाजानुसार, यावर्षी भारतात 7 लाखाहून अधिक iPhones विकले जातील. गेल्या 15 वर्षांत आयफोनच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळमध्ये आयफोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशातील प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमधील 80 टक्क्यांहून अधिक iPhones चा वाटा आहे.

- Advertisement -

Apple कंपनी चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन बाजारपेठेत उत्पादनासाठी कंपनी मोठी दावेदारी करत आहे. Apple ने 2017 मध्ये भारतात iPhone SE चे उत्पादन सुरू केले. आज कंपनी आयफोन एसई, आयफोन 12, आयफोन 13 आणि आता आयफोन 14 यासह देशातील काही सर्वात प्रगत iPhones तयार करते.

या महिन्याच्या सुरुवातीला अॅपलने आपली नवीन आयफोन सीरीज – आयफोन 14 मॉडेलचे लाँचिंग केले. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये सुधारित कॅमेरा, शक्तिशाली सेन्सर आणि उपग्रह संदेश सुविधा समाविष्ट आहे. यात चार मॉडेल्स आहेत ते म्हणजे आयफोन 14, प्लस, प्रो आणि प्रोमॅक्स.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात बनवलेला iPhone 14 येत्या काही दिवसांत स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. भारतात बनवलेले फोन भारतीय बाजारपेठ आणि निर्यात दोन्हीसाठी असतील.आयफोन 14 चेन्नईच्या बाहेरील Foxconn च्या श्रीपेरुंबदुर प्लांटमधून निर्यात केला जाईल.

ऍपलने पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही भारतात आयफोन 14 तयार करण्यास उत्सुक आहोत. हा नवा आयफोन 14 तांत्रिक आणि महत्त्वपूर्ण सुरक्षा फिचर्ससह लाँच होणार आहे. iPhone 14 हा 7 सप्टेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आला होता आणि 16 सप्टेंबर 2022 पासून हा फोन इतर बाजारपेठांसह भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.


Russia Ukraine War : ‘या’ देशाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना उघड पाठिंबा देत जगाला दिली धमकी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -