घरदेश-विदेशFarmers Protest: शेतकरी आंदोलनाविरोधात योगी सरकार आक्रमक

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाविरोधात योगी सरकार आक्रमक

Subscribe

बॉर्डरखाली करण्याचे दिले आदेश

देशात प्रजासत्ताक दिनादिवशी कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर उत्तर प्रदेशातील भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अधिक आक्रमक झाले आहेत. आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांविरोधात कडक पावले उचलत ज्याठिकाळी शेतकरी धरणे धरु बसले होते. त्याठिकाणाहून त्यांनी बुधवारी रात्रीपासून हटकवले जात आहे. तसेच हिसंक आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. यानंतर गाझियाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. (UP Yogi Government order DM to stop Farmer Protest of Every district). उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी आंदोलन बंद करण्याचे आदेश दिलेत. याबाबत केंद्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलन बंद होईल यासाठी उपाययोजना करण्यास सांगितलंय. यानंतर पोलीस प्रशासनाने गाझीपूर येथे बंदोबस्त वाढवत आंदोलनाची जागा रिकामी करण्यास सांगितलंय. मात्र, शेतकऱ्यांनी याला विरोध केलाय.

गाझीपूर बॉर्डरवर पॅरा मिलिट्री जवाना, पोलिसांची संख्या वाढवण्यात आलीय. पुन्हा कोणताही अनूसुचित प्रकार घडू नये यासाठी गायियाबादच्या रस्त्यांवर पोलीसांकडून फ्लॅग मार्चही केला जात आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी गाझियाबाद प्रशासनाकडून मिळणाऱ्या पाणी, साफसफाई, शौचालय सुविधा, अन्नधान्य सुविधा पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. गाजीपूर बॉर्डर परिसरात प्रशासनाकडून बुधवारी अचानक वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला होता.त्याचदरम्यान संपूर्ण परिसरात मोठ्यासंख्येने पोलीस फाटा तैनात करण्यात आला. त्यातच युपीच्या बागपत जिल्ह्यातही गेल्या ४० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. येथील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ड करत, टेंन्टची नासदूस करत, दुखापत केल्याने आंदोलक शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. परंतु या आरोपांना बागपत पोलिसांनी विरोध करत शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर न केल्याचे सांगितले. तसेच याठिकणाचे आंदोलन शांततापूर्वक संपवल्याचे बोलले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -