घरदेश-विदेशव्यापारी महासंघाचा ५०० मेड इन चायना वस्तूंवर बहिष्कार

व्यापारी महासंघाचा ५०० मेड इन चायना वस्तूंवर बहिष्कार

Subscribe

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा निर्णय

पूर्व लडाखमधील गॅलवान खोऱ्यातील लभारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. चीनच्या हिंसक कृतीमुळे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटनं चीनला व्यापारातून उत्तर देणारा निर्णय घेतला आहे. कॅटनं चीनमध्ये (मेड इन चायना) तयार केल्या जाणाऱ्या ५०० वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तुंची यादीही कॅटनं तयार केली आहे.

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गॅलवान खोऱ्यात सैनिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा देशभरातील व्यापाऱ्यांनी निषेध केला आहे. संधी मिळेल तेव्हा चीन भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असतो. चीनची ही भूमिका भारताच्या विरूद्ध असल्याचं सांगत व्यापारी महासंघाने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या अभियानातंर्गत मंगळवारी बहिष्कार टाकण्यात येणाऱ्या ५०० मेड इन चायना वस्तूंची यादी जारी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सलग ११ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले


“सध्या चीनमधून भारतातील वार्षिक आयात ५.२५ लाख कोटी रुपयांची आहे. महासंघाने पहिल्या टप्प्यात ३००० वस्तूंची निवड केली आहे. या वस्तू भारतातही तयार होतात. मात्र स्वस्त मिळत असल्याकारणाने आतापर्यंत चीनमधून आयात केल्या जात आहेत. या वस्तू तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज लागत नाही. त्यामुळे चिनी वस्तूंऐवजी भारतात तयार करण्यात आलेल्या वस्तूंचा उपयोग सहजपणे केला जाऊ शकतो. यामुळे चीनवर अवलंबून राहणं कमी होईल,” असं महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले.

- Advertisement -

या वस्तूंवर टाकला बहिष्कार?

कॅटने बहिष्कार टाकलेल्या वस्तूंमध्ये दैनंदिन कामात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, हॅण्ड बॅग, कॉस्मेटिक, भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू, ईलेक्ट्रीकल्स व ईलेक्ट्रॉनिक्स, लहान मुलांची खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, कापड (टेक्सटाइल), बांधकामासाठी लागणारे साहित्य, फुटवेअर, गारमेंटस, स्वयंपाक घरात वापरात येणारं सामान, खाद्यान्न, घड्याळ, ज्वेलरी, स्टेशनरी साहित्य, कागद, घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फर्निचर, लाईटिंग, आरोग्यासंबंधी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, पॅकिंगसाठी वापरलं जाणारं साहित्य, ऑटो पाटर्स, दिवाळी व होळी या सणाच्या काळात विकल्या जाणाऱ्या वस्तू, चश्मे अशा ५०० प्रकारच्या श्रेणीतील ३००० वस्तूंचा समावेश आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -