Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल प्रलयाची गोष्ट करणारी व्यक्ती; अर्थमंत्र्यांविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस

राहुल प्रलयाची गोष्ट करणारी व्यक्ती; अर्थमंत्र्यांविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणजे प्रलयाची गोष्टी (डूम्सडे मॅन) करणारी व्यक्ती असल्याचे भर संसदेत सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधी यांची हेटाळणी केल्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस जारी करण्यात आलीय. काँग्रेसचे लोकसभा सदस्य टी.एन. प्रतापन यांनी ही नोटीस दिली आहे. लोकसभेत मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आरोप करणार्‍या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना उत्तर देत असताना अर्थमंत्री यांनी लोकसभेतच ही टिप्पणी केली.

‘काँग्रेस नेते भ्रामक समजुती पसरवतात. देशाला तोडणार्‍या ताकदींसोबत उभे राहतात आणि संविधानिक संस्थांचा अपमान करतात’ असा आरोप यावेळी सीतारामन यांनी केला. यावेळी, कदाचित राहुल गांधी भारताचे ‘डूम्सडे मॅन’ बनत आहेत, असे विधान सीतारामन यांनी केले.

- Advertisement -

प्रतापन यांनी सीतारामन यांच्या या टिपणीवरून लोकसभा अध्यक्ष कार्यालयाला त्यांच्याविरोधात विशेषाधिकार हनन नोटीस सोपवली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सदनातील एक सदस्य राहुल गांधी यांच्याविरुद्ध ‘डूम्सडे मॅन’ असल्याचा, भारताला तोडणार्‍या तत्वांसोबत उभं राहण्याचा आणि देशाला कमजोर दाखवण्याचा आरोप केला आहे. त्या कोणत्या आधारावर या पद्धतीचे आरोप करत आहेत? असा प्रश्न प्रतापन यांनी आपल्या नोटिशीत विचारला आहे. सदनात या पद्धतीने आरोप लावण्याचे चलन सुरू राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असेही प्रतापन यांनी आपल्या नोटिशीत म्हटले आहे.

- Advertisement -