घरदेश-विदेशकराचीत बॉम्बस्फोट; २ पोलीसांचा मृत्यू तर ३ दहशतवादी ठार

कराचीत बॉम्बस्फोट; २ पोलीसांचा मृत्यू तर ३ दहशतवादी ठार

Subscribe

देशातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या कराचीतील क्लिफ्टन परिसरात स्फोटाचा धमाका झाला असून यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील चिनी दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी घडल्याचे समोर आले आहे. देशातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कराचीतील क्लिफ्टन परिसरात स्फोटाचा धमाका झाला. या स्फोटात आणि गोळीबारात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार काही दहशतवादी दूतावासमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झाले असून त्यांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन पोलिसांना निशाणा बनवला आहे.

- Advertisement -

कराचीतील रेड झोन परिसरात स्फोट

पाकिस्तानमधील कराचीतील या परिसराला रेड झोन असे म्हटले जाते. जगातील अनेक देशांचे कार्यालय याठिकाणी आहेत. त्यामुळे सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था या परिसरात ठेवली जाते. तरीही, ३ ते ४ हल्लेखोरांनी चिनी दुतावासाच्या कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा हल्ला घडविण्यात आला आहे. दरम्यान, हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप माहिती नाही. पण, पाकिस्तानमधील सुरक्षा रक्षकांना घटनास्थळाला घेराव घातला असून पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -