घरमहाराष्ट्रसर्वांना हसवणाऱ्या पुलंना जेव्हा डॉ. नारळीकर हसवतात

सर्वांना हसवणाऱ्या पुलंना जेव्हा डॉ. नारळीकर हसवतात

Subscribe

पुण्यात नुकताच पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'पुलोत्सव' साजरा करण्यात आला होता. या महोत्सवात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या जुन्या आठवणीतील किस्से सांगितले.

“विनोद आणि बटाटेवडा ही आमच्या दोघांची आवडीची गोष्ट. आम्हाला बटाटेवडे फार आवडतात. या बटाट्यावरुन एक किस्सा आठवतो तो म्हणजे ‘बटाट्याची चाळ’च्या धर्तीवर मी ‘उडती तबकडी’ ही कथा लिहिली होती. या कथेचे वाचन सुनीताबाई यांनी पुलंच्या घरी आमच्या समोर केले होते. या कथेतील काही स्थळं अशी होती तिथे पुलंना हसायला आलं. त्यामुळे भाईंना मी हसवलं आहे, याचा मला आनंद होत असल्याचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले. पुण्यातील पुलोत्सवात जयंत नारळीकर यांनी हा किस्सा सर्वांना सांगितला.

पुण्यातील ‘पुलोत्सव’

महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्तव पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिक यांच्यातर्फे आयोजित ‘पुलोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते नारळीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला विरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, गजेंद्र पवार यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

वाचा – ‘पुलं’च्या घरी जाऊन गहिवरला सचिन तेंडुलकर!


आठवणीतील किस्सा

जयंत नारळीकर यांनी त्यांच्या अनेक आठवणीतील किस्से सांगितले. जयंत नारळीकर यांनी लक्ष्मणरेषेची गंमत सांगताना सांगितले कि, केंब्रिजहून भारतात आलो त्यावेळी माझे लग्न ठरले होते. माझ्याबद्दल पुष्कळसे लिहून आल्यामुळे मंगला आणि मी, आम्ही सार्वजनिक ठिकाणी जात नव्हतो. मंगलाच्या काकांनी ‘वाऱ्यावरची वरात’ची दोन तिकिटे दिली होती. नाटकाला आम्ही येणार असल्याचे माझ्या मामांनी पुलंना सांगितले होते. नाटकाला आम्ही येणार असल्याचे माझ्या मामांनी पुलंना सांगितले होते. नाटकाचा पहिला अंक संपल्यावर पुलंनी आम्हाला भेटायला बोलावले होते. त्यानंतर नाटक सुरु झाले तेव्हा पुलंनी जयंत नारळीकर आले आहेत. मात्र, तुम्ही नाटक बघणार नाही म्हणून ते कुठे बसले आहेत हे सांगणार नाही असे जाहीर केले. मग नाटक संपण्याआधी दहा मिनिटे आम्ही टॅकसीने घरी आलो. त्यानंतर दूरध्वनीवर फोन आला. पुलं आणि सुनीताबाई यांनी माझे अभिनंदन केले. मला फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे सायंकाळच्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले. ही गोष्ट पुलांना आधीच माहिती होती, तरी त्यांनी मला सांगितली नाही. हा जुन्या आठवणीतला किस्सा अजून मला आठवत असल्याचे जयंत नारळीकर यांनी सांगितले.

- Advertisement -

वाचा – जगभरात साजरी होणार ‘पु. लं’ ची जन्मशताब्दी 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -