घरताज्या घडामोडीOmicron Variant: देशात ओमिक्रॉन रुग्णांची वाढ; राजधानी दिल्लीत आढळला पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण

Omicron Variant: देशात ओमिक्रॉन रुग्णांची वाढ; राजधानी दिल्लीत आढळला पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण

Subscribe

देशात हळूहळू ओमिक्रॉन रुग्णांची वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबतची माहिती आहे. दिल्लीतील हा पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण एलएनजेपीमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेल्या १२ लोकांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये ११ लोकांना सौम्य कोरोना असल्याचे दिसले. परंतु १२वा व्यक्ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला. ओमिक्रॉनबाधित हा रुग्ण आफ्रिकन देश टांझानियामधून भारतात परत आला होता. या व्यक्तींच्या संपर्कातील ६ लोकांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

दिल्लीत एक ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. यामध्ये दोन कर्नाटक, एक गुजरात आणि एक महाराष्ट्राच्या रुग्णाचा समावेश आहे. त्यानंतर आज पाचव्या ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, आतापर्यंत १७ लोकं परदेशातून आले होते, ज्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एलएनजेपीला दिल्ली सरकारने कोरोना उपचारासाठी मुख्य रुग्णालय म्हणून घोषित केले आहे.

देशातील चार बड्या शहरात ओमिक्रॉनची एंट्री

देशातील पहिले दोन रुग्ण कर्नाटकमधील बंगळुरूत आढळले होते. त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये एक तर महाराष्ट्रातील मुंबईमधील डोंबिवलीत एक ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. आता दिल्लीसारख्या मोठ्या शहरात ओमिक्रॉनने एंट्री केली आहे.


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनची मुख्य शहरात एन्ट्री, मात्र घातक नाही – तज्ज्ञ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -