घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनची मुख्य शहरात एन्ट्री, मात्र घातक नाही - तज्ज्ञ

Omicron Variant: ओमिक्रॉनची मुख्य शहरात एन्ट्री, मात्र घातक नाही – तज्ज्ञ

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने भारतात पाय पसरायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी ओमिक्रॉनने भारतात प्रवेश केला आणि आता देशातीत विविध राज्यांमध्ये पसरण्यास सुरुवात केली आहे. या भीतीच्या वातावरणात आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉन इतर कोरोनाच्या व्हेरिएंटपेक्षा घातक असल्याचे पुरावे अद्याप नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच ओमिक्रॉन हा सौम्य लक्षणांसोबत मुख्य शहरात पोहोचला असून जास्त घाबरण्याची गरज नसल्याचे सीएसआयआर इन्स्टिट्यूटचे माजी प्रमुख डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले आहे.

सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने काय सांगितले?

‘कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन घातक असल्याचे पुरावे नाही आहेत. या नवा व्हेरियंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. तसेच ओमिक्रॉनवर सध्या उपलब्ध असलेली कोरोना लस प्रभावी नसल्याचे पुरावे नाहीत. या व्हेरियंटवर अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. येत्या काळात याबाबत आणखीन माहिती समोर येईल,’ असे सिंगापूर आरोग्य मंत्रालायने सांगितले.

- Advertisement -

डॉ. राकेश मिश्रा काय म्हणाले?

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. राकेश मिश्रा हायब्रिड इम्युनिटीच्या परिणामकारकतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘हायब्रिड इम्युनिटी नवा व्हेरियंटसोबत लढण्यासाठी उपयुक्त ठरेल. यावर्षीच्या सुरुवातीला जेव्हा देश दुसऱ्या कोरोना लाटेसोबत सामना करत होता तेव्हा डेल्टा व्हेरियंट खूप घातक होता. आता आलेला ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे हा व्हेरियंट सौम्य लक्षणांसह मोठ्या शहरांमध्ये पोहोचला आहे आणि हे खूप चांगले संकेत आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – Omicron-ओमीक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -