घरCORONA UPDATELockDown: धक्कादायक! आग्र्यात एकावेळी घरामध्ये ५ जणांचे मृतदेह

LockDown: धक्कादायक! आग्र्यात एकावेळी घरामध्ये ५ जणांचे मृतदेह

Subscribe

देशात कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र अशात दिल्लीतील आग्र्याहून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथे एकाचवेळी घरात पाच जणांचे मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी एटा येथे राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे घरात मृतदेह आढळले असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ही बाब उघडकीस आली. तिथे पोलिसांना सर्वांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता.

हेही वाचा – मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता – राजेश टोपे

- Advertisement -

काय आहे संपूर्ण घटना

शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आग्र्यातील एटाच्या मोहल्ला श्रृंगार नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. रात्री उशिरापर्यंत शेजाऱ्यांना कोणी घराबाहेर पडताना दिसले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांचा संशय बळावला. त्यापैकीच कुणीतरी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा तोडला. त्यांनी आत प्रवेश केला असता तिथे पाच जणांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये राजेश्वर प्रसाद पचौरी (७५), दिव्या (३५), आयुष्य (८), लालू (१) आणि बुलबुल (२०) यांचे मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी पडल्याचे दिसून आले.

राजेश्वर या वयोवृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर दिव्याच्या हाताची नस कापलेली होती. घटनास्थळी जागेवरच ब्लेडचा तुकडा आणि सल्फासच्या गोळ्या पोलिसांना आढळल्या आहेत. नेमकी कोणत्या वेळी ही घटना घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. राजेश्वरचा मुलगा दिपील रुडकी येथे काम करत असून तो त्यावेळी घरी नव्हता. घरामध्ये फक्त मुले आणि महिला होत्या. ही हत्या आहे की आत्महत्या हे समजू शकलेले नाही. पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत असून लवकरच याचा छडा लावला जाईल, असे पोलिसांकडून सांगितले गेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -