मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता – राजेश टोपे

जर कोरोना संक्रमितांची संख्या थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

rajesh tope statement on school reopen decision
शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ दिवसांत होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या ४ मे रोजी कदाचित मागे घेतला जावू शकतो. देशासह राज्यातील लॉकडाऊन जरी उठवला तरी मुंबई आणि पुण्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना आणि पुणेकरांना ३ मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही शक्यता वर्तवली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण जर कोरोना संक्रमितांची संख्या थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं राजेश टोपे म्हणाले. सध्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास आम्ही ३ मेनंतर मुंबई, पुण्यातील फक्त कंटेन्मेंट झोनमधील भागात आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो, असं टोपेंनी सांगितलं.


हेही वाचा – Lockdown crisis: राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांचा पाठिंबा


दरम्यान, राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या महिन्याभरात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील सर्व हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन सुरूच ठेवावा लागेल. तथापि, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम तसंच सोहळे-समारंभांवर १८ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. याशिवाय, ३ मेनंतर मुंबई आणि पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात कमीत कमी १५ दिवस कुठल्याही महत्त्वाच्या नसणाऱ्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असं टोपेंनी सांगितलं.