घरदेश-विदेशLockdown: दारू न मिळाल्याने ५ मित्रांनी प्यायले 'मिथेनॉल'; दोघांचा गेला जीव

Lockdown: दारू न मिळाल्याने ५ मित्रांनी प्यायले ‘मिथेनॉल’; दोघांचा गेला जीव

Subscribe

लॉकडाऊन असल्याने सर्व ठिकाणी दारूची दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. मात्र दुकानं बंद असल्याने दारू न मिळाल्यामुळे पाच मित्रांनी प्यायले मिथेनॉल

देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर तो वाढवून ३ मे पर्यंत वाढवला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्ग वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, तसेच अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लॉकडाऊन असल्याने सर्व ठिकाणी दारूची दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. मात्र दुकानं बंद असल्याने दारू न मिळाल्यामुळे पाच मित्रांनी मिथेनॉल प्यायले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातील तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे आहे.

- Advertisement -

LockDown: इंस्टाग्रामवर पठ्ठ्यानं शोधले ग्राहक; तिप्पट किंमत घेत विकली दारू

असा घडला प्रकार

ही घटना तामिळनाडूतील कडलूर शहरातील असून या पाचही मित्रांना दारूचे व्यसन होते. ते रोज दारूची पार्टी करत असल्याने त्याची त्यांना सवय झाली होती. मात्र त्यांच्या जवळील दारूच्या बाटल्यांचा साठा संपल्याने त्यांनी मंगळवारी चक्क मिथेनॉल पिऊन पार्टी केली. त्यामुळे त्यांच्या सर्वांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे आणि तिघांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ते पाचही जण पेस्टिसाइड फर्ममध्ये काम करत असून त्या ठिकाणाहून त्यांनी मिथेनॉल आणले होते. या घटनेबाबत पोलिसांनी तक्रार दाखल केली असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला दारु न मिळाल्याने त्याने सॅनिटाझर प्यायल्याची घटना घडली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात वाईन शॉप सुरू करावे अशी मागणी तेथे अनेकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -