घरताज्या घडामोडीदिल्लीत बब्बर खालसा संघटनेशी जोडलेल्या ५ दहशतवाद्यांना अटक

दिल्लीत बब्बर खालसा संघटनेशी जोडलेल्या ५ दहशतवाद्यांना अटक

Subscribe

भाजप आणि आरएसएसचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते.

दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे समोर येत आहे. या चकमकीत दिल्ली पोलिसांना बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेशी संबंधित असलेल्या ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. माहितीनुसार, दिल्लीतील शकरपूर परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान रविवारी रात्री पळून जाणाऱ्या पाच दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यादरम्यान दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि अन्य विस्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलीस या पाच दहशतवाद्यांची सातत्याने चौकशी करत आहे. भाजप आणि आरएसएसचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, असे समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान बब्बर खालसाच्या या ५ दहशतवाद्यांचे कनेक्शन पाकिस्तानच्या आयएसआय एजेंसीसोबत असल्याचे समोर आले आहे. हे दहशतवादी आयएसआयच्या इशारावरून हल्ला करणार होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शेतकरी आंदोलन दरम्यान असे झाल्यामुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

या ५ दहशतवाद्यांमध्ये २ जण पंजाब तर ३ जण काश्मीरचे आहेत, अशी माहिती दिल्लीच्या विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिली आहे. दरम्यान अटक झालेल्या एकाचा शौर्यचक्र विजेता बलविंदर सिंग यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या हत्येमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीची नक्की भूमिका काय होती याचा तपास केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covishield Vaccine: सीरमकडून तात्काळ मान्यता देण्यासाठी DCGI कडे अर्ज


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -