घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये फडकला तिरंगा

काश्मीरमध्ये फडकला तिरंगा

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर श्रीनगरला प्रथमच तिरंगा फडकला. ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील शेर-ए-काश्मीर मैदानात राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. काश्मीरचा विकास आणि समृद्धीत असलेले अडथळे दूर करण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.

काश्मिरी जनतेला संबोधित करताना राज्यपाल पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीरसह खोर्‍यातील नागरिकांना आश्वस्त करतो की त्यांच्या ओळखीचे कोणतेही भांडवल केले जाणार नाही. तसेच ती पुसणारही नाही. कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा निर्णय ऐतिहासिक आहे. आर्थिक विकास, शांतता आणि भरभराट या मुख्य विषयांकडे लक्ष वेधण्याऐवजी काश्मिरातील लोकांची गेल्या ७० वर्षांपासून त्यांच्या जगण्याशी संबंधित नसलेले निर्माण करून दिशाभूल करण्यात आली आहे. भारतीय संविधानाने असंख्य प्रादेशिक ओळखीसह स्वतःचा विकास करण्याचे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आपली ओळख पुसली जाणार आहे, असे सांगून कुणीही त्रास देण्याचा प्रयत्न करू नये.

- Advertisement -

कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा राज्यात आपली भाषा, संस्कृती आणि ओळख याचा विस्तार करण्यासाठी केला जाऊ शकतो. काश्मिरी, डोगरी, गोजरी, पहारी, बाल्टी, शीना यासह इतर भाषांना आपली भरभराट करण्याची संधी मिळाली आहे. काश्मिरातील सिव्हील सोसायटी आणि सर्वांच्या सहकार्यानेच काश्मिरातून स्थलांतरीत झालेल्या काश्मिरींना परत आणता येणार आहे. काश्मिरी पंडितांशी सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिने बांधल्या गेलेल्या काश्मिरातील नागरिकांच्या सहकार्यानेच हे होणार आहे, असेही राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -