घरCORONA UPDATEBreaking: छोट्या उद्योगांसाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचे कर्ज - अर्थमंत्री

Breaking: छोट्या उद्योगांसाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचे कर्ज – अर्थमंत्री

Subscribe

एमएसएमई क्षेत्रांसाठी (सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग) ३ लाख कोटींपर्यंतची विना गॅरंटी कर्ज योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केली आहे. ज्यांची २५ कोटींची कर्ज रक्कम शिल्लक आहे आणि १०० कोटींची उलाढाल आहे, त्यांना याचा फायदा होईल. यामध्ये कुणालाही कोणतंही तारण द्यावं लागणार नाही. पहिल्या वर्षात मुद्दल वसूल केली जाणार नाही. ४ वर्षांसाठी हे कर्ज दिलं जाईल. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ही योजना उपलब्ध असेल. त्याचा ४५ लाख अडचणीत नसलेल्या पण सामान्य सूक्ष्म, मध्यम आणि लघु कुटीरोद्योग, घरगुती उद्योगधंद्यांना फायदा होईल. जेणेकरून ते त्यांचा उद्योग जिवंत ठेऊ शकतील, अशी अपेक्षा निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

ही मदत जाहीर करत असताना सरकारने MSME क्षेत्राची व्याख्या देखील निश्चित केली आहे. सूक्ष्म उद्योग आता २५ लाखांऐवजी १ कोटीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. तर लघू उद्योगासाठी ५ कोटीवरुन १० कोटीपर्यंत गुतंवणूक स्विकारता येणार आहे. तर मध्यम उद्योगाकरीता १० कोटीवरुन २० कोटीपर्यंत गुंतवणूक स्वीकारता येणार आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -