घरट्रेंडिंगCoronaVirus: ३ वर्षाच्या चिमुकल्याने कप केक्स विकून पोलिसांसाठी ५० हजारांचा गोळा केला...

CoronaVirus: ३ वर्षाच्या चिमुकल्याने कप केक्स विकून पोलिसांसाठी ५० हजारांचा गोळा केला निधी

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढतच आहे. या कोरोनाच्या संकटात अनेक बॉलिवूड कलाकारांसह, उद्योजक मदतीचा हात पुढे करत आहे. सर्वसामान्य लोक देखील आपापल्या परीने सरकारला मदत करत आहेत. नागरिकांच्या रक्षणासाठी अहारोत्र काम करणाऱ्या पोलिसांकरिता एका तीन वर्षाच्या चिमुकल्याने चक्क ५० हजार रुपयांची निधी गोळा केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेटकरी चिमुकल्याचे कौतुक करत आहेत.

या चिमुकल्याचे नाव कबीर असून तो अवघ्या तीन वर्षांचा आहे. त्याने मुंबई पोलिस फाउंडेशनसाठी कप केक्स तयार करून निधी गोळा केला आहे. १० हजार रुपये देण्याचे त्याचे लक्ष्य होते. मात्र त्याच्या कप केक्सच्या विक्रीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्याने कुटुंबियांसह पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांना ५० हजार रुपयांच्या धनादेश दिला आहे.

- Advertisement -

या मुलाचे कौतुक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा योगदानाची कथा या व्हिडिओत सांगितली आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिस फाउंडेशनसाठी निधी गोळा करण्याकरिता हे कप केक्स अनेक चॅरीटीला विकले. त्याने हे कप केक्स आईच्या मदतीने तयार केले. लॉकडाऊनमध्ये कबीरची आई बेकरी पदार्थ तयार करायची. त्यावेळेस कबीरला देखील त्यात आवड निर्माण झाली. या चिमुरड्याचे योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे.

सोशल मीडियावर नेटकरी कबीरविषयी काय म्हणाले ते पाहा.


हेही वाचा – Huawei Y9s ट्रिपल रियर कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -