घरदेश-विदेशसंडासात अन्न शिजवायला काय हरकत आहे? - आमदार इमरती देवी

संडासात अन्न शिजवायला काय हरकत आहे? – आमदार इमरती देवी

Subscribe

मध्य प्रदेशात अंगणवाडी सेविका शौचालयात अन्न शिजवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, या प्रकरणाचे समर्थन काँग्रेसच्या आमदार आणि मध्य प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री इमारती देवी यांनी केले आहे. शौचालयात अन्न शिजवणे गैर नसल्याचे इमारती देवी म्हणाल्या आहेत.

मध्य प्रदेशमध्ये करेरा येथील एका अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका लहान मुलांसाठी शौचालयात अन्न शिजवत असल्याची धक्कादायक बाब उघकीस आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विविध माध्यमातून अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, आंगणवाडी प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका होत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री इमरती देवी यांनी अंगणवाडी सेविकेच्या कृत्याचे समर्थन केले आहे. शौचालयात अन्न शिजवणे काहीही गैर नसल्याचे इमरती देवी म्हणाल्या आहेत. याशिवाय ‘शौचालयाचे भांडे आणि अन्न शिजवण्याचा स्टोव्ह यांच्यामध्ये लाकडी फळी आहे. त्यामुळे यात काहीही गैर नाही’, असे इमरती देवी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – गावच्या शौचालयाचे दरवाजे चोरीला गेले अन्‌ बेरडवाडीकरांची राष्ट्रभक्ती जागी झाली

- Advertisement -

नेमके काय म्हणाल्या इमरती देवी?

‘एक लक्षात घ्या की, शौचालयाचे भांडे आणि अन्न शिजवण्याचा स्टोव्ह यांच्यात लाकडी फळी ठेवली होती. त्यामुळे यात गैर असे काहीच नाही. शिवाय आपल्या घरामध्येही स्नानगृह आणि शौचालय संलग्न असतात. मग आता त्यावरुन तुमच्या घरी आलेल्या नातेवाईकांनी जेवणास नकार दिला तर?’, असे इमरती देवी म्हणाल्या. यापुढे त्या म्हणाल्या की, ‘शौचालयाचे भांडे आपल्याही स्नानगृहामध्ये असते. याशिवाय त्या अंगणवाडी केंद्राच्या शौचालयाचा वापर केला जात नव्हता. शौचालयाचा वापर स्वयंपाक म्हणून सुरु होता. ज्या ठिकाणी ते भांडे होते, त्या भागाचा वापर कपाट म्हणून केला जात होता.’ याप्रकरणी तपास सुरु असल्याचेही इमरती देवी यांनी सांगितले.

imarti devi
मध्य प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री इमरती देवी

अंगणवाडी सेविकांवर होणार कारवाई

यासंदर्भात जिल्हाधिकारी देवेंद्र सुंद्री यांनी सांगितले की, ‘काही अंगणवाडी सेविकांनी शौचालयाचे रुपांतर स्वयंपाक घरात केले होते. या सर्व अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.’ दरम्यान, याप्रकरणावरुन मध्य प्रदेशात मोठा गदारोळ सुरु झाला आहे. मुलांना पोषक आहार मिळावे यासाठी अंगणवाडीमध्ये लहान मुलांना अन्न दिले जाते. मात्र, या घटनेमुळे खरच लहान मुलांना पोषक आहार दिले जाते का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये शौचालय बांधा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -