घरदेश-विदेशजमावाकडून होणाऱ्या हत्या रोखा - सर्वोच्च न्यायालय

जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखा – सर्वोच्च न्यायालय

Subscribe

जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करा. असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सोशल मीडियावरून वाढत्या अफवा आणि त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये जमावाकडून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत.

मुले पळवणारी टोळी,गोवंश तस्करी अशा अफवांचे पेव सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहे. त्यामुळे अनेक निष्पापांना आपला जीव गमवाव लागला आहे. जमावाकडून वाढत्या हत्या रोखण्यासाठी सरकारने नवीन कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. यावेळी नागरिक कायदा हातात घेऊ शकत नाहीत असे स्पष्ट निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी अफवांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गोवंश तस्करीच्या संशयातून जमावाकडून झालेल्या मारहाणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज ( मंगळवारी ) झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत. सरन्यायधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भविष्यात जमावाकडून हत्या पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कोणती पावले उचलली यावर देखील सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जमावाकडून हत्येच्या घटना

धुळ्यातील राईनपाडा येथे १ जुलै रोजी पाच जणांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाचही जणांची हत्या करण्यात आली होती. राईनपाडा गावात ५ जण बाजारात उरले होते. यावेळी त्यांनी एका लहान मुलीशी संवाद साधला. दरम्यान, ही लहान मुले पळवणारी टोळी असावी या संशयातून ५ जणांना ३५ जणांनी जबर मारहाण केली होती. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये पहिल्यांदा काही लोक चपलीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही तरूणांनी त्यांना राईनपाडा गावातील ग्रामपंचायतीमध्ये डांबले आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. मालेगावमध्ये देखील अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिली होती.

- Advertisement -

कर्नाटकातल्या बिदरमध्येही मुले पळवत असल्याच्या संशयावरुन गुगलसारख्या कंपनीमध्ये काम केलेल्या इंजिनिअरला आपला जीव गमवावा लागला होता. मोहम्मद आजम अहमद असं या ३२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. मोहम्मद हा मुळचा हैदराबाद राहणारा होता. बिदरच्या मुरकी इथे राहणाऱ्या आपल्या तीन मित्रांना भेटण्यासाठी मोहम्मद बिदरला आला होता. मित्रांना भेटून निरोप घेताना एका मित्राने लहान मुलांना चॉकलेट वाटायला सुरुवात केली. पण त्याच वेळी कुणीतरी चॉकलेट वाटतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर ‘मुले पळवणारी टोळी’ अशा आशयाचा संदेश लिहून व्हायरल केला. हे तरूण तिथून पुढे गेल्यानंतर पुढच्या गावात एका जमावाने त्यांना गाठले. या जमावाकडून झालेल्या मारहाणीत चारही जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या तरुणांना जमावाच्या तावडीतून सोडवण्यात आले. तरुणांना उपचारांसाठी रुग्णालयात नेताना मोहम्मदचा वाटेतच मृत्यू झाला. तर अन्य तिघांवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मध्यप्रदेशातील उन्नावमध्ये देखी गोमांस असल्याच्या संशयावरून एकाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर अफवा पसरत आहेत. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये मारहाणीच्या घटना घडत आहे. आता या घटना रोखण्यासाठी सरकारने कायदा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

वाचा – धुळे मारहाण प्रकरण; आणखी एक अटकेत

वाचा – मुले पळवण्याच्या अफवेवरुन गुगलच्या इंजिनिअरची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -