घरदेश-विदेशहरियाणाच्या बहादूरगडमधील कारखान्यात विषारी वायूमुळे चार कामगारांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

हरियाणाच्या बहादूरगडमधील कारखान्यात विषारी वायूमुळे चार कामगारांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

Subscribe

हरियाणाच्या बहादूरगडमधील रोहाड एमआयडीसी परिसरात एका कारखान्यात टाफी साफ करताना विषारी गॅसमुळे चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर दोन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. मृत आणि प्रकृती गंभीर असलेले कर्मचारी उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत. दोन बेशुद्ध अवस्थेतील कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत कर्मचाऱ्यांची नावे

१) राजबीर मुलगा तेजराम, (रा. कपेंदिना, तिहार, उत्तर प्रदेश)
२) अजय कुमार मुलगा राम सुमिरन, (रा. मदिरापूर, नवाबगंज, शाहजहांपूर, उत्तरप्रदेश)
३) जगतपाल मुलगा बादशाह. (रा. मदिरापूर, शाहजहानपूर, उत्तर प्रदेश)
४) प्रकाश मुलगा मैकू (रा. रोटी, बुढेरा, बाराबंकी, उत्तर प्रदेश)

- Advertisement -

या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. रोहाड औद्योगिक परिसरात असलेल्या एरोफ्लेक्स लि. या कारखान्यात गॅसकट पेपर तयार केला जातो. या कामात अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. केमिकलचे सांडपाणी कारखान्याच्या मागे सुमारे पाच फूट खोल खड्ड्यात जाते. ते भरले की, ट्रॅक्टर-टँकरमध्ये भरून सांडपाणी काढले जाते.

या टाकीतील सांडपाणी बुधवारी टँकरमध्ये भरण्यात आले. घटनेच्या वेळी घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सुमारे दोन फूट गाळ खाली राहिल्यानंतर तो काढण्यासाठी कारखान्याच्या एका कामगाराला खाली आणण्यात आले. काही क्षण गाळ हलवल्यानंतर तो बेशुद्ध होऊन आत पडला. त्याला काढण्यासाठी दुसरा कर्मचारी खाली उतरला असता तोही खाली पडला. अशात एकामागून एक खाली उतरलेले सहा कामगार विषारी वायूमुळे बेशुद्ध झाले.

- Advertisement -

याची माहिती मिळताच कारखान्यात एकच खळबळ उडाली. यावेळी कसा तरी दोरीच्या साहाय्याने सर्वं कर्मचाऱ्यांना बाहेर काढून शहरातील जीवन ज्योती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चार मजुरांना मृत घोषित केले. चारही मृत युपीचे रहिवासी होते. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले इतर दोन मजूरही यूपीचे रहिवासी आहेत. या घटनेनंतर कारखाना मालक गायब झाल्याचे रुग्णालयाबाहेर जमलेल्या कामगारांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपायुक्त कॅप्टन शक्ती सिंह आणि पोलीस अधीक्षक वसीम अक्रम यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा आढावा घेतला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डीसींनी दाखल झालेल्या दोन्ही कामगारांची प्रकृती जाणून घेतली आणि डॉक्टरांना चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या. एसपी वसीम अक्रम म्हणाले की, पीडितांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

आयसीयूमध्ये दाखल असलेली दोन कामगार

१) मयंक मुलगा सेटपाल, रा. मदिरापूर, शहाजहापूर, (यूपी)
२) विकास मुलगा राधेश्याम, रा. मदिरापूर, शहाजहापूर, (यूपी)


हेही वाचा : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०; वाचा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 10 महत्वाचे निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -