घरदेश-विदेशबाप्पाच्या लाडवाचा १६ लाखांमध्ये लिलाव!

बाप्पाच्या लाडवाचा १६ लाखांमध्ये लिलाव!

Subscribe

बाळापूर गणेशाचा हा लाडू तब्बल १६ लाख ६० हजार रुपयांना विकला गेला. यंदाच्या विक्रीने मागील २५ वर्षातील रेकॉर्ड मोडले आहेत.

मुंबईसह राज्यभरात आणि राज्याबाहेरही गणपती बाप्पांना नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांमध्ये विसर्जनानंतर गणपतीच्या दागिन्यांचा, प्रसादाचा तसंत अन्य वस्तूंचा लिलाव केला जातो. बाप्पाचे भक्तही या वस्तू विकत घेण्यासाठी एकच गर्दी करतात. काही मोठ्या आणि नावाजलेल्या मंडळांमध्ये तर हा लिलाव एखाद्या सोहळ्यासमान असतो. हैदराबादजवळ असणाऱ्या बाळापूर गावातही काहीसा असाच प्रकार पाहायला मिळाला. बाळापूर गावातील ‘बाळापूर गणेश’ या सार्वजनिक गणेशोत्व मंडळात बाप्पाच्या प्रसादाचा शानदाल लिलाव पाहायला मिळाला. बाप्पाला आवडणाऱ्या प्रसादापैकी एक म्हणजे लाडू. अशाच एका महाकाय लाडवाचा याठिकाणी लिलाव करण्यात आला. विशेष म्हणजे श्रीनिवास गुप्ता यांनी तब्बल १६ लाख ६० हजार रुपयांना हा लाडू विकत घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे यामुळे लाडवाच्या लिलावाचे मागील २५ वर्षातील रेकॉर्ड मोडले गेले आहेत. ‘बाळापूर गणेशाच्या’ या लाडवाला आजवर विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


वाचा: अस्थी विसर्जन करुन येणारे, ‘ते’ मृत्यू्च्या कचाट्यात

गेल्या २५ वर्षांपासून होतोय लिलाव

या लाडवाची खासियत म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून नित्यनियमाने या भल्यामोठ्या लाडूचा लिलाव केला जात आहे. दरवर्षी याठिकाणी कोणत्या ना कोणत्या भक्ताकडून असाच एका महाकाय लाडू बाप्पाचरणी अर्पण केला जातो आणि विसर्जनानंतर या लाडवाचा लिलाव होतो. गेल्या २५ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. गेल्यावर्षी २०१७ मध्ये १५ लाख ६० हजार रुपयांना लाडवाचा लिलाव झाला होता, तर २०१६ मध्ये १४ लाख ६५ हजार रुपयांना या लाडवाचा लिलाव झाला होता. १९९४ साली लाडू ४५० रुपयांना विकला गेला होता. यावर्षी बाळापूर गणेशाला दान करण्यात आलेला हा लाडू २१ किलो वजनाचा होता. दरम्यान या लिलावाच्या लाडवाबद्दल इथल्या लोकांमध्ये एक विशेष धारणा आहे. दरवर्षी लिलावामध्ये हा लाडू जो विकत घेतो त्याची भरभराट होते तसंच तो जीवनात यशस्वी होतो, असा इथल्या लोकांचा समज आहे. त्यामुळे अनेक लोक लिलावाचा हा लाडू मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -