घरताज्या घडामोडीइस्राईलचा गाझात एअर स्ट्राईक; मीडियाची ऑफिसेस असलेली इमारत कोसळली 

इस्राईलचा गाझात एअर स्ट्राईक; मीडियाची ऑफिसेस असलेली इमारत कोसळली 

Subscribe

इस्राईल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे.

इस्राईलच्या सैन्याने शनिवारी गाझा येथे एअर स्ट्राईक केला असून यात मीडियाची ऑफिसेस असलेली एक इमारत कोसळली. या इमारतीमध्ये असोसिएटेड प्रेस आणि अल-जझीरा आदी मीडिया नेटवर्कची ऑफिसेस होती. तसेच या इमारतीत निवासी घरेही होती. इस्राईलच्या सैन्याने ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर साधारण तासाभराने त्यांनी एअर स्ट्राईक केला आणि यात ही संपूर्ण इमारत कोसळली. गेल्या सोमवारपासून गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होऊ लागली आहे. यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. या काळात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

शनिवारी करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये १२ माळ्याची इमारत कोसळली. परंतु, इस्राईलने याच इमारतीला लक्ष्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एअर स्ट्राईक करण्याआधी इस्राईलच्या सैन्याने दुपारी या इमारतीच्या मालकाला फोन करून ताकीद दिली होती. तसेच असोसिएटेड प्रेसचे कर्मचारी आणि अन्य लोकांना इमारतीतून बाहेर निघण्यास सांगण्यात आले होते. तसेच याच इमारतीत कतार सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या अल-जझीरा या मीडिया नेटवर्कचे ऑफिस असून त्यांनी या एअर स्ट्राईकचे थेट प्रक्षेपण केले.

- Advertisement -

इस्राईल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये मागील महिन्यापासून मोठा संघर्ष सुरू आहे. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होऊ लागली आहे. इस्राईल सरकार आणि पॅलेस्टिनींमध्ये सुरू असलेला हा संघर्ष आता अधिकच वाढत चालल्याचे चित्र आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -