घरदेश-विदेशCPI(ML)च्या कार्यक्रमात सहभाग; जर्मन नागरिकाविरोधात गुन्हा दाखल

CPI(ML)च्या कार्यक्रमात सहभाग; जर्मन नागरिकाविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

CPI(ML)च्या रविवारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर या नागरिकाविरोधात फॉरेन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुमादी नरसिंहा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर सहभागी झाले होते.

CPI(ML)च्या कार्यक्रमात सहभागी होणं एका जर्मन नागरिकाला चांगलंच महागात पडलं आहे. CPI(ML)च्या रविवारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर या नागरिकाविरोधात फॉरेन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुमादी नरसिंहा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर सहभागी झाले होते. वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर हे इंटरनॅशनल कोऑरडिनेशन ऑफ रिऑशनरी पार्टी आणि ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत. बैंगळूरूमध्ये आयोजित एका परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर भारतात आले होते.  पण त्यानंतर वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर हे  गुमादी नरसिंहा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर गुप्तचर विभागनं दिलेल्या माहितीवरून गुमादी नरसिंहा आणि वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १४बी आणि १४सी या विदेशी कायद्यातंर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, गुन्हा सिद्ध झाल्यास अकेल्झेंडर यांना पाच वर्षाची शिक्षा किंवा मग दंड आकारला जाऊ शकतो. दरम्यान पोलिसांनी वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आम्ही अकेल्झेंडर यांना लवकर अटक करू असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, गुमादी नरसिंहा यांनी वाईडमन जॉर्ज अकेल्झेंडर कोण आहेत हे आपल्याला माहित नसल्याचा दावा केला आहे. तो जर्मन नागरिक आम्हाला ओळत नाही. आम्हाला त्याची भाषा देखील येत नाही? त्यानंतर देखील आम्ही त्याच्याशी कसा काय संपर्क साधू? असा सवाल गुमादी नरसिंहा यांनी विचारला आहे. आमच्या पक्षानं त्याला आमंत्रित केलेलं नव्हतं. तो स्व:ताहून जर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला असेल तर आम्हाला त्याची काहीही कल्पना नाही. दरम्यान, पोलिसांना त्याच्याविरोधात काहीही कारण नसताना गुन्हा दाखल केल्याचं नरसिंहा यांनी म्हटलं आहे. नरसिंहा यांनी पाच वेळा आमदारकी भूषवली आहे. २००९ आणि २०१४ साली त्यांचा पराभव झालेला आहे. दरम्यान सध्या ते येलांडू या मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -