घरक्रीडाकोर्टातही क्रिस गेलची जोरदार बॅटिंग; मानहानीचा खटला जिंकला

कोर्टातही क्रिस गेलची जोरदार बॅटिंग; मानहानीचा खटला जिंकला

Subscribe

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल जसा आपल्या वादळी खेळीसाठी प्रसिद्ध आहे. तसा तो आपल्या खासगी जीवनातील प्रसंगामुळेही नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा नव्या प्रकरणामुळे गेल चर्चेत आला आहे. मात्र यावेळी सरशी गेलची झाली आहे. अब्रुनुकसानिच्या एका खटल्यात क्रिस गेल जिंकला असून त्याला तीन लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची (२२०,७७० अमेरिकन डॉलर्स) भरपाई मिळाली आहे. ऑस्ट्रेलियिन मीडिया फेयरफैक्सच्या विरोधात त्याने हा खटला जिंकला आहे. २०१५ साली घडलेल्या एका प्रसंगाचे चुकीचे वार्तांकन केल्यामुळे न्यु साऊथ वेल्स सुप्रिम कोर्टाने हा दंड फेयरफैक्स मीडियाला ठोठावला आहे.

फेअरफॅक्स मीडियाने जानेवारी २०१६ साली क्रिस गेलची बदनामी करणारी बातमी छापली होती. २०१५ च्या विश्वचषकादरम्यान क्रिस गेलने एका महिलेसोबत अश्लिल वर्तन केले होते. एवढेच नाही तर त्या महिलेला क्रिस गेलने आपले गुप्तांग दाखवले असल्याचे वृत्त फेअरफॅक्स मीडियाने छापले होते. या बातमीनंतर क्रिस गेलने फेअरफॅक्स विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. फेअरफॅक्स माझे करिअर संपवण्यासाठीच माझ्याविरोधात खोट्या बातम्या देत असल्याचा प्रतिवादही गेलने कोर्टात केला होता. दुसऱ्या बाजुला बातमीच्या सत्यतेबद्दल फेअरफॅक्स मीडिया कोणतेही पुरावे कोर्टात सादर करु शकले नाहीत. त्यामुळे न्यायाधीश मॅककॅलम यांनी क्रिस गेलच्या बाजुने निर्णय दिला.

- Advertisement -

आमचे गोलंदाज कोहलीला अडचणीत टाकतील – टीम पेन

न्यू साउथ वेल्स कोर्टाने सांगितले की, गेल वर केलेल्या आरोपांमुळे त्याचे चारित्रहनन झाले आहे. त्यामुळे फेअरफॅक्सने तीन लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची भरपाई त्याला द्यावी. तसेच फेअरफॅक्सची बातमी ही द्वेषमूलक होती, असाही निर्वाळा कोर्टाने यावेळी दिला.

- Advertisement -

कोर्टाच्या निर्णयावर मात्र फेयरफॅक्स मीडियाने नाराजी व्यक्त केली असून ते पुन्हा अपील करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले. “कोर्टाने पुर्वग्रहदुषित राहून फेअरफॅक्स मीडियाला न्याय दिलेला नाही.”, असे वक्तव्य फेअरफॅक्सच्या प्रवक्त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -