घरदेश-विदेशप्रेमाला नकार दिला म्हणून तरुणीला जाळले

प्रेमाला नकार दिला म्हणून तरुणीला जाळले

Subscribe

रविवारी रात्री ८ वाजता ही तरुणी कॉलेजमधून स्कुटीने घरी जात होती. त्यावेळी आरोपी मनोज सिंह (३१) तिची वाट पाहात बसला होता. ती आल्यावर त्याने तिला थांबवून स्वत:चे प्रेम व्यक्त केले

प्रेमाला नकार दिला म्हणून एका १८ वर्षाच्या तरुणीवर रॉकेल ओतून तिला जाळण्याचा धक्कादायक प्रकार देहरादूनमध्ये घडला आहे. पौरी गरवाल या ठिकाणी ही घटना घडली आहे. मुलीला पेटवणारा हा ३१ वर्षांचा असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी ही घटना घडली. मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तिला न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले आहे. शिवाय गुन्हेगारास शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

वाचा- प्रेमभंगातून दोन तरुणींची आत्महत्या

नेमकी घटना काय?

रविवारी रात्री ८ वाजता ही तरुणी कॉलेजमधून स्कुटीने घरी जात होती. त्यावेळी आरोपी मनोज सिंह (३१) तिची वाट पाहात बसला होता. ती आल्यावर त्याने तिला थांबवून स्वत:चे प्रेम व्यक्त केले. त्या तरुणीने मनोजला नाही म्हणत स्कुटी चालवायला सुरुवात केली. पण नकार दिला याचा राग त्याला आला आणि त्याने आणलेल्या पेट्रोल कॅनमधील पेट्रोल मुलीच्या अंगावर ओतून त्याने काडीपेटी लावून तिला पेटवले. यात ती ८० टक्के भाजली. भाजलेली तरुणी रस्त्याच्याकडेला बसून रडत असताना तिला एकाने जाताना पाहिले आणि त्याने तातडीने पोलिसांना बोलावले. त्यानंतर त्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -
हे नक्की वाचा- जेलमधून पळाला आणि त्याचा खून झाला!

पुरुषाची विकृती

मनोज सिंह हा ३१ वर्षांचा आहे. तो विवाहित आहे. पण मुल नसल्यामुळे तो आणि त्याची बायको सोबत राहत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.तो या तरुणीच्या मागे आठवडाभरापासून लागला होता. वयाचा कोणताही विचार न करता त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्याय हवा

सध्या या मुलीवर ऋषीकेशमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या तरुणीवरील प्रसंगानंतर ती ज्या कॉलेजमध्ये शिकते. तेथील इतर विद्यार्थ्यांनी त्या तरुणीला न्याय मिळावा यासाठी सोमवारी रात्री आंदोलन केले. गुन्हेगाराला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -