घरमहाराष्ट्ररामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत - पृथ्वीराज चव्हाण

रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत – पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावे यासाठी स्वत: शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्याला गेले आहेत. परंतु, त्यांच्या या दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांवर टीका केली आहे.

सध्या राममंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राम मंदिरासाठी देशभरातील सगळ्या हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावे यासाठी स्वत: शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्याला गेले आहेत. परंतु, त्यांच्या या दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, आमदार आनंदरराव पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष आप्पा माने, अशोकराव पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा – मंदिर नाही तर सरकार नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

- Advertisement -

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपने विकासाची दाखवलेली स्वप्ने भंग पावली आहेत. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्याने सेना-भाजपला पुन्हा राम आठवत आहे. परंतु, रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत, असे ठाम मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचारांची जोपासणी करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. यावेळी ते मराठा आरक्षाबाबतही बोलले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तर आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. या आरक्षणाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळाले तरी हरकत नाही. पण, आरक्षणासाठी मराठा समाजाची फसवणूक करु नका. अन्यथा उद्रेक होईल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.


हेही वाचा – अयोध्येत आज हिंदू विश्व परिषदेची महासभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -