घरदेश-विदेशमुलीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन

मुलीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन

Subscribe

नवी दिल्ली : जालौनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कॉलेजमधून घरी परतणाऱ्या मुलीची दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी पिस्तूल घटनास्थळी सोडून पळ काढला आहे. पोलीस स्टेशनपासून फक्त 200 मीटर अंतरावर ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावा घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

ही घटना ईटी कोतवाली परिसरातील कोत्रा ​​तिराहे येथील आहे, असे सांगितले जात आहे की, ऐंधा गावातील रहिवासी रोशनी अहिरवार (20) ही सोमवारी ईटी येथील राम लखन पटेल महाविद्यालयात बीएची परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षा देऊन ती कोत्रा ​​तिराहेच्या दिशेने घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पिस्तुल दाखवून तिला थांबवले आणि त्यातील एकाने तिच्या डोक्यात गोळी झाडली, यात तिचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबाने राज अहिरवार या तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या तरुणांला अटक केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

ही मुलगी गोळी लागल्यानंतर जमिनीवर पडल्यानंतर स्थानिक लोक आणि पोलीस तिच्याकडे पाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका होत आहे. मुलगी कॉलेजच्या गणवेशात असून तिच्याजवळ एक पिस्तूल दिसत आहे. त्यामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बिहार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची मिडिया कॅमेऱ्यांसमोर तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

राष्ट्रीय जनता दलानेही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून यूपी सरकारवर निशाणा साधला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “गोदी मीडियाचे लांडगे आणि भाजप हा मृत्यू साजरा करतील का?”

- Advertisement -

भरदिवसा मुलीची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना घडल्यानंतर काही लोक तरुणांना पकडण्यासाठी धावले, मात्र दुचाकीवर असलेले तरुण घटनास्थळीच पिस्तूल सोडून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच ईटी पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी जालौनचे पोलीस अधीक्षक डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, २० वर्षीय रोशनी तिच्या घरी जात असताना तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ती बीए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -