घरताज्या घडामोडीगो फर्स्ट विमानानं 50 प्रवाशांना सोडलं वाटेतच, डीजीसीएने मागितला अहवाल

गो फर्स्ट विमानानं 50 प्रवाशांना सोडलं वाटेतच, डीजीसीएने मागितला अहवाल

Subscribe

देशांतर्गत असणाऱ्या एअरलाइन्स कंपनीने GoFirst या विमानावर गंभीर आरोप केले आहेत. या विमानानं 50 प्रवाशांना रस्त्यावरच सोडून उड्डाण घेतली. काही प्रवासी चढण्यासाठी शटल बसची वाट पाहत होते. मात्र, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर रस्त्यावरच राहिलेल्या प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. तसेच हा सर्व प्रकार निष्काळजीपणाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA) विमान कंपनीकडून या घटनेचा अहवाल मागितला आहे.

काही प्रवाशांनी सोशल मीडियावर आरोप केलाय की, बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या GoFirst विमानाने प्रवाशांनी भरलेली बस घेतली नाही. तसेच विमान जी8 116 ने 50 प्रवाशांना मागे सोडून रवाना झाल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

गोफर्स्टने या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. तर एअरलाइनने ट्विट करत प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सतीश कुमार या एका प्रवाशाने ट्वीट करत म्हटले की, फ्लाइट G8 116 ने 50 प्रवाशांना जमिनीवर सोडले. 50 हून अधिक प्रवाशांना रस्त्यावरच सोडण्यात आले. त्यामुळे गो फर्स्ट, ज्योतिरादित्य सिंधिया, पीएमओ इंडिया झोपेत आहे का? काहीही मूलभूत तपासणी नाही, असं ट्वीट कुमारने केलं आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एअरलाइन्सकडून या प्रकरणाबाबत अहवाल मागितला आहे. या प्रकरणावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -


हेही वाचा :११६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्विस बँकेला मोठा झटका, शेअर्सच्या मूल्यात घसरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -