घरदेश-विदेशगोव्याचे ‘मुख्यमंत्री’ पर्रीकर पुन्हा रुग्णालयात; प्रकृती स्थिर

गोव्याचे ‘मुख्यमंत्री’ पर्रीकर पुन्हा रुग्णालयात; प्रकृती स्थिर

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्वादूपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून पर्रीकरांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. मात्र, या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. सध्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्यावर गेल्या काही दिसांपूपर्वी त्यांच्या नियमित चाचण्या करण्यासाठी त्यांना गोमेकॉमध्ये नेण्यात आले होते. काही वेळाने ते वैद्यकीय चाचण्या करुन दोनापावल येथील आपल्या राहत्या घरी परतले. मात्र त्यांना गोमेकॉमधील रुग्णालयात न्यावे लागल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता आणि चर्चा व्यक्त केली जात असतानाच त्यांनी घराबाहेर पडून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पर्रीकर घराबाहेर पडून थेट मीरामारला त्यांचे वाहन गेले आणि तिथे ते एक फेरफटका मारुन आले असल्याची माहिती देखील समोर आली होती.

पर्रीकर यांची प्रकृती चांगली

मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आपल्याला चांगली दिसली असून ते खूपवेळ आपल्याशी बोलले आहे. ते जुवारी पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आता लवकरच निघतील. तसेच मनोहर पर्रीकर प्रत्यक्षात दुपारी अडीचच्या सुमारास घरातून वाहनाने बाहेर आले आणि थेट मीरामारला त्यांचे वाहन गेले. तिथे ते एक फेरफटका मारुन ते माघारी आले असल्याची माहिती सरदेसाई पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचप्रमाणे पर्रीकर यांच्या सेवेसाठी गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर कायम असतात. एम्सच्या दोघा डॉक्टरांनी गेल्याच आठवड्यात पर्रीकर यांना गोमेकॉत येऊन तपासले असून पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यांनी दिलेल्या औषधांना ते चांगला प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पर्रीकरांवर दिल्लीत झाले होते उपचार

मनोहर पर्रीकर गेल्या ७ महिन्यांपासून स्वादूपिंडाच्या आजारामुळे त्रस्त आहेत. याआधी त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात २ वेळा आणि त्यानंतर अमेरीकेत ३ वेळा उपचार झाले आहेत. प्रकृती खालावल्यामुळे मनोहर पर्रीकर यांना कलंगुट येथील एका खासगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची तब्बेत अधिक खालावल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते.


वाचा – गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांचा ‘मीरामार’ला फेरफटका; प्रकृतीत सुधारणा

वाचा – पर्रीकरांनी आता पद सोडावे, काँग्रसने केली विनंती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -