घरदेश-विदेशगोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांचा 'मीरामार'ला फेरफटका; प्रकृतीत सुधारणा

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांचा ‘मीरामार’ला फेरफटका; प्रकृतीत सुधारणा

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून रविवारी ते घराबाहेर पडून थेट मीरामारला एक फेरफटका मारुन आले असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्वादूपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रविवारी त्यांच्या नियमित चाचण्या करण्यासाठी त्यांना गोमेकॉमध्ये नेण्यात आले होते. काही वेळाने ते वैद्यकीय चाचण्या करुन दोनापावल येथील आपल्या राहत्या घरी परतले. मात्र त्यांना गोमेकॉत या रुग्णालयात न्यावे लागल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता आणि चर्चा व्यक्त केली जात असतानाच त्यांनी घराबाहेर पडून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पर्रिकर घराबाहेर पडून थेट मीरामारला त्यांचे वाहन गेले आणि तिथे ते एक फेरफटका मारुन आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्री आपल्या कार्यालयात जाऊन काम सुरु करतील अशील माहिती सूत्रांनी दिली आहे.

यांनी घेतली पर्रिकरांची भेट

मुख्यमंत्री पर्रिकर यांची कृषीमंत्री तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सोमवारी भेट घेतली. या भेटीमध्ये विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांच्याशी राजकीय आणि विकास कामांविषयी चर्चा करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच आपण दक्षिण गोव्यात जुवारी पुलाचे काम कसे चाललेय ते लवकरच पाहून येऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांना सांगितले आहे. विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांना याबाबत सांगितले आहे.

- Advertisement -

पर्रिकर यांची प्रकृती चांगली

मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आपल्याला चांगली दिसली असून ते खूपवेळ आपल्याशी बोलले आहे. ते जुवारी पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आता लवकरच निघतील. तसेच मनोहर पर्रिकर प्रत्यक्षात दुपारी अडीचच्या सुमारास घरातून वाहनाने बाहेर आले आणि थेट मीरामारला त्यांचे वाहन गेले. तिथे ते एक फेरफटका मारुन ते माघारी आले असल्याची माहिती सरदेसाई पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचप्रमाणे पर्रिकर यांच्या सेवेसाठी गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर कायम असतात. एम्सच्या दोघा डॉक्टरांनी गेल्याच आठवड्यात पर्रिकर यांना गोमेकॉत येऊन तपासले असून पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यांनी दिलेल्या औषधांना ते चांगला प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


वाचा – ‘मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य’

- Advertisement -

वाचा – मनोहर पर्रिकरांचा हा ‘अवतार’ तुम्ही पाहिलात का?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -