घरमहाराष्ट्रमातोश्रीच्या भेटीनंतरही जालन्याचा तिढा कायम, उद्या होणार निर्णय

मातोश्रीच्या भेटीनंतरही जालन्याचा तिढा कायम, उद्या होणार निर्णय

Subscribe

एकीकडे भाजपाकडून जालनाच्या जागेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला असताना, या जागेसाठी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकरदेखील आग्रही आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या खोतकर आणि दानवे वादावर अद्यापही पडदा पडलेला नसून, उद्या याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माध्यमाशी बोलताना उद्या या जागेवर निर्णय होणार असून, निर्णय माझ्या बाजूनेच लागेल असा विश्वास बोलून दाखवला आहे. उद्या मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आहेत. त्यामुळे ‘उद्या हे दोन्ही नेते जो काय निर्णय घेतील तो अंतिम असेल,’ असे खोतकर यांनी सांगितले आहे.

ही जागा शिवसेनाच जिंकेल

ही जागा शिवसेनेला का सोडावी हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले असून, जर ही जागा शिवसेनेला सोडली तर ही जागा शिवसेना जिंकेल असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले असून, उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असे खोतकर यांनी यावेळी सांगितले. ‘मी आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवले असून, जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी असे मी त्यांना सांगितले. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल हा विश्वास मला आहे हे मी उद्धवजींना पटवून दिले आहे. तसेच पंकजा ताई समन्वयक म्हणून आज बैठकीला आल्या होत्या.
काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय झाला नाही उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद च्या बैठकीत अंतिम निर्णय होईल’, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -