घरलोकसभा २०१९जरा हटकेभाडिपाच्या मंचावर युवा नेते आदित्य ठाकरे

भाडिपाच्या मंचावर युवा नेते आदित्य ठाकरे

Subscribe

भाडिपा या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर लवकरच युवा सेना नेते आदित्य ठाकरे येणार आहेत. येत्या १९ मार्चला हा संवाद रंगणार आहे.

भाडिपा कोणाला माहित नाही असं नाही. आज प्रत्येक नेटसॅव्ही तरूण ‘भाडिपा’ साठी वेडा आहे. भाडिपाचे व्हीडीओ, सॅण्डअप कॉमेडी, भाडीपाच्या प्रत्येक शो ची चाहते आतुरतेने वाट पहात असतात. भाडिपाच्या ‘कास्टिंग काऊच’ या सिरीजला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. भाडिपाने नव्यानेच लोकमंच नावाने एक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात राजकीय नेत्यांशी कॅज्युएक गप्पा मारल्या जातात. लवकरच या कार्यक्रमात शिवेसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत.

आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. नव्याने राजकारणात येणाऱ्या नव्या  नेतृत्वाकडेही आजची तरुणाई आकर्षित होत आहे. राजकीय प्रचार सभा असो किंवा विविध आंदोलने यात तरुणांचा वाढता सहभाग आहे. युवा सेनेच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी आजच्या युवकांचे अनेक प्रश्न मांडत युवा सेनेची बांधणी केली. महाराष्ट्रातील युवकांचे दमदार नेतृत्व म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. युवा नेते आदित्य ठाकरे यांचा सध्याचे राजकारण आजच्या तरूणाईच्या प्रश्नांकडे बघण्याचा नेमका दृष्टीकोन कसा आहे हे सगळं जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी भाडिपाच्या ‘लोकमंच’ द्वारे मिळणार आहे.

- Advertisement -

मंगळवार १९ मार्चला शिवाजी मंदीरला सायंकाळी ६ वा. संवादक सविता प्रभुणे या आदित्य ठाकरे यांच्यासोबत हा संवाद साधणार आहेत.‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत तरुण मतदार आणि राजकारणी यांच्यातला संवादाचा दुवा साधण्याचे काम करणाऱ्या   भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणाऱ्या आदित्य ठाकरे यांची विविध विषयांवरील रोखठोक मते या संवादाच्या निमित्ताने जाणून घेता येणार आहेत.

या आधी लोकमंचाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच औपचारिकता कमी करण्यासाठी ‘मला सतत ‘सर’ म्हणण्याची आवश्यकता नाही हे ‘कॅज्युअल ए’ असे मुलाखतकार निपुण धर्माधिकारीला सांगत मुख्यमंत्र्यांनी हशा आणि टाळ्या मिळवल्या. सोबतच रोजगार, कृषीमालाला हमीभाव, महिलांसाठी सार्वजनिक शौचालये, शासनाची बंद पडलेली संकेतस्थळे या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. पुण्यात सुरु असलेल्या अभियंत्यांच्या आंदोलनाबाबत ‘लोकमंचच्या’ व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका पहिल्यांदाच उघडपणे जाहीर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -