घरदेश-विदेशपाकिस्तानात सोने झाले महाग

पाकिस्तानात सोने झाले महाग

Subscribe

कुठल्याही देशात सर्वसामान्य नागरिकांसाठी महागाईला तोंड देणे भयंकर असते. ही महागाई व्हेनेझुएला आणि झिम्बाब्वेसारख्या देशांत हजार टक्क्यांवर गेली तर मग अर्थव्यवस्था कोलमडलीच. आणि एखादा देश कर्जात पूर्ण बुडाला असेल तर महागाईचा कडेलोटच म्हणायचा. सध्या हीच परिस्थिती आहे पाकिस्तानची. पंतप्रधान इम्रान खान हताश झालेत. पाकिस्तानात पेट्रोल डिझेलनंतर सोन्याचे भावही प्रचंड वाढले आहेत. शुक्रवारी सोन्याची किंमत ८६,२५० पाकिस्तानी रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय.

10 ग्रॅम सोन्याची किंमत भारतात 37920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पाकिस्तानात सोन्याची किंमत 86,250 पाकिस्तानी रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. भारताच्या तुलनेत ही दुप्पट आहे. पाकिस्तानी वेबसाईट डॉनने म्हटले आहे की, जगभरात सोन्याची किंमत वाढण्याचा परिणाम पाकिस्तानवर झालाय.

- Advertisement -

ऑल इंडिया सर्राफा ज्वेलर्स असोसिएशन (ASSJA)चे म्हणणे आहे की, 32 डॉलर प्रति औंस उडी मारत जगभरात सोन्याची किंमत 1,495 डॉलर प्रति औंस झालीय. पाकिस्तानी रुपया कमजोर झाल्यानं त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर पडलाय.

काल (7ऑगस्ट) भारतात दिल्लीत सोनं 1,113 रुपयांनी महागले आहे. आता ते 37,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदीही 650 रुपयांनी वधारलीय. चांदी आता 43,670 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याची किंमत 1,487.20 डॉलर प्रति औंस झाली, तर चांदी 16.81 डॉलर प्रति औंस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -