घरदेश-विदेशआयटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

आयटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

Subscribe

आयटीने झेप घेतल्यामुळे नोकरभरतीत २१ टक्क्याांची वाढ करण्यात आली आहे. या संधीचा फायदा अधिकाधिक लोकांना होणार असल्याचे सांगितल्या जात आहे.

आयटीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक गोड बातमी आहे. जर तुम्ही आयटीमध्ये करिअर करण्यासाठी नोकरी शोधत असाल तर येता काळ तुमच्यासाठी चांगला आहे. आयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली आहे. आयटी नोकऱ्या संदर्भातील जॉबस्पीकचा निर्देशांक २ हजार ८८ अंकावर पोहचला. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी याच काळात हा आकडा १ हजार ७२८ अंकावर होता. नोकरी डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणानुसार ऑक्टोबर महिन्यात आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरभरती झाली आहे.

आयटीने पुन्हा घेतली झेप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा नियमांमध्ये बदल केले होते. व्हिसावर लादलेल्या बंधनामुळे आयटी क्षेत्रात पिछेहाट झाली होती. परंतू, मागील दोन महिन्यांमध्ये आयटी सेक्टरने पुन्हा झेप घेतली आहे. याचा फायदा नोकर भरतीला झाला आहे. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना घसघशीत पगारवाढही मिळाली आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आयटीची भरभराट टिकून राहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

जॉबस्पीक निर्देशांक

नोकरी डॉट काॅमवर प्रत्येक महिन्याला नोंद होणाऱ्या रोजगार नोंदणीच्या आधारावर एक निर्देशांक तयार केला जातो. यासाठी जुलै महिन्यापासूनची आकडेवारी गृहित धरल्या जाते. यामहिन्यात प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये १ हजार अंकाची वाढ दिसून आली आहे. वर्षातील एकूण आकडेवारीची सरासरी काढून हा निर्देशांक ठरवण्यात येतो. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता, ब्लॉकचेन इत्यादी क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप कंपन्यांनीही चांगले प्रदर्शन केले आहे.

“जॉबस्कीपचा निर्देशांक आपली गती कायम राखून आहे. ऑक्टोबरमध्ये नेत्रदीपक २१ टक्के वाढीसह त्याने झेप घेतली आहे. रोजगार शोधण्यासाठी हा शुभसंकेत आहे. शहरांचा विचार करता मेट्रोपोलिटन शहरांत सर्वाधिक वाढ बघायला मिळाली. २३ टक्के वाढीसह चेन्नई आणि दिल्ली पहिल्या स्थानी आहेत.”- नोकरी डॉट कॉमचे मुख्य विक्री अधिकारी व्ही. सुरेश 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -