घरदेश-विदेशनिवृत्तीच्या एक दिवसापूर्वी गृहखात्याने दिले आलोक वर्मांना रुजू होण्याचे आदेश

निवृत्तीच्या एक दिवसापूर्वी गृहखात्याने दिले आलोक वर्मांना रुजू होण्याचे आदेश

Subscribe

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांना गृह खात्याकडून पून्हा आपल्या पदावर रुजू होण्याचे आदेश मिळाले आहेत. निवृत्तीच्या एक दिवस आधी हे आदेश त्यांना देण्यात आले.

केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) चे माजी संचालक आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन दोन आठवडे झाले होते. त्यांना या पदावर रुजू होण्याचे आदेश गृहखात्याकडून देण्यात आले आहे. निवृत्तीला एक दिवस राहिला असतानाच त्यांना हे आदेश मिळाले. त्यांनी दिलेला राजीनामा ही अजून स्विकारण्यात आलेला नाही. वर्मा यांनी निवृत्तीपूर्वी एक दिवस आपल्या पदावर रुजू होऊन काम करावे असे गृह खात्याने सांगितले आहे. गृहमंत्रालयाने वर्मा यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. यावर अजून वर्मा यांनी कोणतेही व्यक्तव्य केले नाही.

काय आहे वाद

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विषेश संचालक राकेश अस्थाना यांच्यात लाचखोरीवरून असलेले वाद पुढे आले होते. त्यानंतर सरकारनं हस्तक्षेप करत दोघांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवलं. पण, आलोक वर्मा यांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. अखेर न्यायालयानं आलोक वर्मा यांना सीबीआय संचालकपदी कायम ठेवलं. मात्र यानंतर आलोक वर्मा यांची बदली करण्यात आली होती. अखेर आलोक वर्मांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -