घरदेश-विदेशCorona: कराचीमध्ये ४९ दिवसांत ३ हजार २६५ मृतदेह केले दफन

Corona: कराचीमध्ये ४९ दिवसांत ३ हजार २६५ मृतदेह केले दफन

Subscribe

कोरोना व्हायरसच्या मृतांची संख्या पाकिस्तान लपवतोय

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम जवळपास संपूर्ण जगावर झाला आहे. त्याला भारताचा शेजारी देश पाकिस्तान देखील अपवाद नाही. इथल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) किट, मास्क आणि हातमोज्यांची सुविधाही नाही. असे असूनही, कोविड -१९ ची प्रकरणे पाकिस्तान कमी दाखवत आहे. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोनाचे ७ हजार ४०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाकिस्तानच्या या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे, कारण गेल्या ४९ दिवसांत कराची शहराच्या स्मशानभूमीत ३ हजार २६५ मृतदेह दफन केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

द ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, कराची प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यापूर्वी पाकिस्तानी माध्यमांमध्ये असे वृत्त आले होते की, कराचीतील रूग्णालयात मोठ्या संख्येने लोक कोरोनामुळे मरत असून प्रशासन सर्वसामान्यांपासून ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या अहवालानुसार, दफन केलेल्या हजारो मृतदेहांविषयी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, किती लोकं मरण पावले याविषयी त्यांनी माहिती दिली नाही.

- Advertisement -

दुसरीकडे, भारतामध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाची ५४३ नवीन  रूग्ण आढळून आले असून शुक्रवारी ही रूग्ण संख्या ६२८ होती. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १४ हजारांच्यावर गेली आहे. गेल्या २४ तासांत ९११ नवीन रूग्णांची नोंद झाली असून ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची एकूण संख्या १४ हजार ३७८ झाली आहे. त्यापैकी ११ हजार ९०६ जणांवर उपचार सुरु आहेत. तर १ हजार ९९२ जण बरे झाले आहेत तर ४८० जणांचा मृत्यू झाला आहे.


कोरोनामुळे बेवारशी कुत्र्यांना मिळाले हक्काचे घर- पाहा व्हिडीओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -