घरCORONA UPDATEहेअर कट बघून कोरोना पडणार संभ्रमात, हरभजनने शेअर केला मजेशीर फोटो!

हेअर कट बघून कोरोना पडणार संभ्रमात, हरभजनने शेअर केला मजेशीर फोटो!

Subscribe

कोरोना व्हायारसला क्न्फुयज करण्यासाठी ही सगळ्यात सोपी पध्दत आहे. असं कॅप्शन हा फोटो शेअर करताना हरभजनने लिहिलं आहे.

भारतीय क्रिकेट टीममधील स्पिनर हरभजन सिंगने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हरभजन नेहमीच सोशल मीडियावर खूप अक्टीव्ह असतो. केवळ स्वत:चे फोटो किंवा व्हीडिओ नाही तर हरभजन खूप वेगवेगळ्या इंन्ट्रेस्टींग गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतो. त्यामुळे त्याचे फँन्सही त्याच्या पोस्टला भरभरून लाईक्स करतात. नुकताच हरभरजनने शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हा.रल होत आहे. या फोटोचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. हा फोटो बघून तुम्ही हसून ङसून वेडे व्हाल.

- Advertisement -

या फोटोत एक न्हावी अनोखी हेअर स्टाईल त्याच्या ग्राहकाला करत आहे. न्हाव्याने ग्रहाकाच्या केसावर चेहरा बनवला आहे. हेअर स्टाईल करताना केसांवर चेहरा काढला आहे. केवळ चेहरा नाही तर चश्मा, दाढी पण काढली आहे. एक सुंदर चेहरा ग्राहकाने आपल्या मागे तयार करून घेतला आहे. असाच एक फोटो फिलीपिंसमध्ये काढला होता.

हरभजनने हा फोटो शेअर करताना छानसं कॅफ्सनही दिलं आहे. कोरोना व्हायारसला क्न्फुयज करण्यासाठी ही सगळ्यात सोपी पध्दत आहे. व्हायरसला कन्फुयज करणारा हा हेअर कट आहे. आता व्हायरसपण विचार करत बसेल आता कोणत्या बाजूने आत जाऊ. हरभजनने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही मिनीटातच पंचवीस हजाराहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. या फोटोवर धम्माल कमेंट आल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, मी अनेकवेळा असा हेअर कट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो काही जमला नाही. तर युजर्स म्हणतो, आता या व्यक्तीला दोन- दोन मास्क घालण्याची गरज पडणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – …तर पुढील वर्षीचे ऑलिम्पिक रद्द होईल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -