घरअर्थजगतHDFC बँकेने ​​FD वरील व्याजदर वाढवले, आजपासून मिळणार अधिक फायदा

HDFC बँकेने ​​FD वरील व्याजदर वाढवले, आजपासून मिळणार अधिक फायदा

Subscribe

बँकेने 2 कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे, म्हणजेच आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याजाचा लाभ मिळणार आहे. नवे व्याजदर 20 एप्रिलपासून लागू झाले आहेत.

नवी दिल्लीः HDFC Bank FD Rates: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही देखील या बँकेत मुदत ठेव केली असेल किंवा तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केले असल्यास त्यावर परिणाम होणार आहे, कारण बँकेने आजपासून व्याजदरात मोठा बदल केला आहे. त्यामुळे FD करण्यापूर्वी तुम्ही नवे दर जाणून घ्या.

एफडीचे व्याजदर वाढले

बँकेने 2 कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे, म्हणजेच आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याजाचा लाभ मिळणार आहे. नवे व्याजदर 20 एप्रिलपासून लागू झाले आहेत.

- Advertisement -

किती व्याज मिळते?

सध्या बँकेकडून ग्राहकांना 2.50 टक्के ते 5.60 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे. बँका ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD सुविधा देतात. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास बँक या ग्राहकांना 50 बेसिस पॉइंट्सचा अधिक फायदा देते. म्हणजेच या ग्राहकांना 3 टक्के ते 6.35 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.

जाणून घ्या किती व्याज मिळते?

7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर – 2.50 टक्के
30 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर – 3.00 टक्के
91 दिवस ते 6 महिन्यांच्या FD वर – 3.50 टक्के
6 महिने 1 दिवस ते 1 वर्ष – 4.40 टक्के
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे – 5.10 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे – 5.20 टक्के
3 वर्षे ते 1 दिवस 5 वर्षे – 5.45%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 5.60 टक्के

- Advertisement -

दुसरीकडे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने SBIने आपल्या ईएमआय ( कर्जाच्या हप्ता) च्या रकमेत वाढ केल्यानंतर अजून काही बँकांनी कर्जाच्या हप्त्यात वाढ केली. यात बँक ऑफ बडोदा (BoB) एक्सिस बँक(Axis Bank) कोटक महिंद्रा बँकेचा समावेश आहे.(Kotak Mahindra Bank)या बँकांनी त्यांच्या कर्जावरील हप्त्यात (MCLR) ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांनी (MCLR)कर्जाच्या हप्त्याच्या रकमेत तीन वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पाहता येत्या काही दिवसात इतर बँकाही त्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन Home Loan, Car Loan आणि Personal Loan च्या हप्त्यांवर होणार आहे. यामुळे सध्या तुम्ही कर्जापोटी भरत असलेल्या ईएमआयची रक्कमही वाढणार आहे.


हेही वाचाः EMI वाढणार, SBI नंतर या बँकानी घेतला निर्णय, यातील तुमची बँक कोणती?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -