घरताज्या घडामोडीEMI वाढणार, SBI नंतर या बँकानी घेतला निर्णय, यातील तुमची बँक कोणती?

EMI वाढणार, SBI नंतर या बँकानी घेतला निर्णय, यातील तुमची बँक कोणती?

Subscribe

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने SBIने आपल्या ईएमआय ( कर्जाच्या हप्ता) च्या रकमेत वाढ केल्यानंतर अजून काही बँकांनी कर्जाच्या हप्त्यात वाढ केली आहे.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने SBIने आपल्या ईएमआय ( कर्जाच्या हप्ता) च्या रकमेत वाढ केल्यानंतर अजून काही बँकांनी कर्जाच्या हप्त्यात वाढ केली आहे. यात बँक ऑफ बडोदा (BoB) एक्सिस बँक(Axis Bank) कोटक महिंद्रा बँकेचा समावेश आहे.(Kotak Mahindra Bank)या बँकांनी त्यांच्या कर्जावरील हप्त्यात (MCLR) ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकांनी (MCLR)कर्जाच्या हप्त्याच्या रकमेत तीन वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पाहता येत्या काही दिवसात इतर बँकाही त्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन Home Loan, Car Loan आणि Personal Loan च्या हप्त्यांवर होणार आहे. यामुळे सध्या तुम्ही कर्जापोटी भरत असलेल्या ईएमआयची रकमही वाढणार आहे.

- Advertisement -

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडींगवर आधारित उधार दरात MCLR ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने एक वर्षासाठी उधार दर ७ टक्क्याहून ७.१० टक्के केला आहे. एसबीआयच्या वेबसाईटवर ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे. त्यात MCLR १५ एप्रिलपासून लागू झाल्याचे सांगण्यात आले आहे. एसबीआयच्या नव्या रेट चार्टनुसार दोन वर्षांसाठी MCLR ०.१ टक्क्यांनी वाढून ७.३० ट्कके आणि तीन वर्षांसाठी ७.४० करण्यात आला आहे.

तसेच बँक ऑफ बडोदा , एक्सिस बँक आणि कोटक महिंद्र बँकेनेही एक वर्षांसाठी MCLR मध्ये वाढ केली आहे. एक वर्षांसाठी बँक ऑफ बडोदाचा नवा MCLR ७.३५ टक्के झाला आहे. तर खासगी क्षेत्रातील एक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकने एक वर्षांसाठी MCLR ७.४० टक्के केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -