घरट्रेंडिंगViral Video: Heat Wave इफेक्ट ! महिलेने कारच्या बोनेटचा केला तवा, भाजली...

Viral Video: Heat Wave इफेक्ट ! महिलेने कारच्या बोनेटचा केला तवा, भाजली चपाती

Subscribe

भारतात अनेक भागात उकाड्याचा पारा चांगलाच दमछाक करणारा ठरत आहे. अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक अशी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेने अनेक भागात सरासरी तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहचला आहे. हवामान विभागानेही अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह ओरिसा राज्याचाही समावेश आहे. ओरिसामध्ये हिट वेव्हचा परिणाम हा नागरिकांना त्रासदायक ठरतोच आहे. पण एका महिलेचा भर उन्हात कारच्या बोनेटवर चपाती भाजण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

ओरिसाच्या सोनेपूर येथील महिलेने चपाती भाजण्यासाठी कोणत्याही आगीचा वापर न करता चक्क कारच्या बोनेटचा वापर केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला चक्क चपाती लाटल्यानंतर कारच्या बोनेटवरच भाजत असताना दिस आहेत. ओरिसाच्या सोनेपूर येथे ४० डिग्री इतके सरासरी तापमान अनेक भागात आहे. अशातच महिला कारच्या तापलेल्या बोनेटचा वापर हा तव्यासारखा करताना दिसली. आश्चर्य म्हणजे तापलेल्या कारच्या बोनेटवरही चपाती चांगली भाजल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेने कारच्या बोनेटवरच पोलपाटावर आधी चपाती लाटली. त्यानंतर तयार झालेली चपाती ही कारच्या बोनेटवर ठेवली आणि चपातीला दोन्ही बाजुने त्या तापलेल्या कारच्या बोनेटवरच भाजले. ही चपाती अशा कडक उन्हात दोन्ही बाजुने चांगलीच भाजलेली दिसून आली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी व्हिडिओच्या निमित्ताने खोचक अशी टीकाही केली आहे. अनेकांनी कारच्या बोनेटवर चपाती भाजल्यासाठी भारतीयांचे कौतुक केली आहे. तर काहींनी सौरऊर्जा हेच भविष्य असेल असेही म्हटले आहे. तर काहींनी येत्या मे महिन्यात लोकांना डाळ आणि भाजीही कारच्या बोनेटवर तापवता येईल असे म्हटले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -