घरAssembly Battle 2022Manipur Elections: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह 24 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे...

Manipur Elections: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह 24 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे शरतचंद्र सिंह पिछाडीवर

Subscribe

मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाल इस्ट जिल्ह्यातील हिंगांग ही महत्त्वाची जागा असून सध्या या जागेच्या निकालावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या जागेवर भाजपचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आहेत. 2007 मध्ये ते येथून आमदार म्हणून निवडून आले होते आणि मणिपूरचे मुख्यमंत्री झाले. 2016 साली एन. बिरेन सिंह काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. पहिल्यांदा या जागेवर 2002 मध्ये डेमोक्रेटिक रिव्हॉल्यूशनरी पीपल्स पार्टीचे उमेदवा म्हणून बिरेन सिंह निवडणूक लढले होते. त्यानंतर आमदार झाले आणि सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2007 साली काँग्रेसचे आमदार झाले. मग 2012 मध्ये बिरेन सिंह दुसऱ्यांदा या जागेवर काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. 2017 साली बिरेन सिंह भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडले. त्यांची ही पाचवी निवडणूक आहे.

बिरेन सिंह यांनी TMCच्या उमेदवाराला हरवले होते

2017 निवडणुकीमध्ये एन. बिरेन सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार पी. शरतचंद्र सिंह यांना हरवले होते. बिरेन सिंह यांना 10 हजार 349 मत मिळाली होती, तर टीएमसीचे शरतचंद्र यांना 9 हजार 233 मत मिळाली होती.

- Advertisement -

यंदा 2022च्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा एन. बिरेन सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर पी. शरतचंद्र सिंह यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यंदा हिंगांग जागेवरून तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा बिरेन सिंह हे शरतचंद्र सिंह यांना पराभूत करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्याचे हिंगांग जागेवरील निकाल

एन. बिरेन सिंह – 24 हजार 268 मत
पी. शरदचंद्र सिंह – 6 हजार 486 मत
नोटा – 239

- Advertisement -

हेही वाचा – Manipur Assembly Election Results: मणिपूरहून मुख्यमंत्री नितीश कुमारांसाठी गूड न्यूज; जेडीयू तीन जागी आघाडीवर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -