घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

देशभरात सीएए आणि एनआरसी या कायद्याविरोधात आंदोलन केली जात आहेत. दिल्लीतील शाहीन बाग असो वा उत्तर प्रदेशातील लखनऊ किंवा दक्षिण भारतातील केरळ राज्य असो, सर्वत्र CAA आणि NRC कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. याशिवाय सलग सातव्या दिवशी मुंबईतील नागपाडा येथे या विरोधात महिलांचं आंदोलन सुरूच आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी या कायद्याबाबत आपली भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या ‘सामना’च्या मुखालखतीत मांडली आहे. ‘हिंदू-मुस्लिमांना जड जाणारा कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही’, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान दिलेल आहे.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सीएए म्हणजे कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. नागरिकत्व सिद्ध करणं हे मुस्लिमांसोबत हिंदुंनाही जड जाईल. त्यामुळे हिंदू-मुस्लिमांना जड जाणारा कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही.’ ही मुलाखत काही दिवसांनी प्रकाशित केली जाणार आहे. आतापर्यंत आठ राज्यांनी एनआरसी कायदा लागू करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एनआरसीच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

- Advertisement -

काँग्रेसच्या भीतीपोटी अशाप्रकारचं वक्तव्य – राम कदम

याचं पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राम कदम म्हणाले की, ‘शिवसेनेच्या आमदारांना आणि मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या दबावामुळे हे वक्तव्य करावं लागतं आहे. शिवसेनेचं हे धोरण काँग्रेसच्या दबावापोटी आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलं आहे. या कायद्याबाबत आमची भूमिका राष्ट्रीय स्तरावर मांडतील. तसंच हा कायदा सर्व राज्यात लागू करावा लागणार आहे. पण केवळ काँग्रेसच्या भीतीपोटी शिवसेना असं वक्तव्य करत आहे.

‘शिवसेना ही महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरतं आहे. लोकसभेत वेगळी भूमिका घ्यायची आणि विधानसभेत वेळ मिळेल तशी वेगळी भूमिका मांडायची. हे काही काळ चालेलं मात्र दीर्घकाळ चालणार नाही. हिंदुंच्या विरोधातील ही भूमिका आहे. तसंच हिंदुंत्व म्हणणारी शिवसेना हिंदुंत्वापासून लांब गेलेली आहे’, असं भाजपचे राम कदम म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – महाबळेश्वरमधील पर्यटकांना मिळणार उत्तम वैद्यकीय सुविधा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -