घरदेश-विदेशधक्कादायक!! गरोदर महिलेला दिलं HIVबाधित रक्त

धक्कादायक!! गरोदर महिलेला दिलं HIVबाधित रक्त

Subscribe

तामिळनाडूमध्ये एका २४ वर्षिय महिलेला एचआयव्हीबाधित रक्त दिलं गेलं आहे. याप्रकरणी ३ जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

लॅब टेक्निशियननं केलेलं अक्षम्य दुर्लक्ष एका २४ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतलं आहे. चेन्नईतील एका रूग्णालयामध्ये २४ वर्षाच्या महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी तिला रक्ताची गरज लागली. परिणामी गरोदर महिलेला रक्त चढवण्यात आलं. पण, रक्त चढवल्यानंतर महिलेला दिलं गेलेलं रक्त हे एचआयव्हीबाधित असल्याचं समोर आलं. चेन्नईपासून ५०० किमी अंतरावर विरुधुनगर जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची दखल घेत सरकारी रक्तपेढीतील ३ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. दोन वर्षापूर्वी लॅब टेक्निशियन HIV बाधित रक्ताची नोंद करण्यास विसरले. पण, त्याचा परिणाम हा सदर महिलेला भोगावा लागला. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. या साऱ्या प्रकारानंतर महिलेच्या घरच्यांना देखील धक्का बसला आहे. पण, मुलाच्या जन्मापर्यंत काहीही न बोलण्याचा निर्णय हा महिलेच्या घरच्यांनी घेतला आहे. या प्रकारानंतर सरकारनं महिलेला नुकसान भरपाईसह तिला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, महिलेच्या नातेवाईकांनी मात्र खासगी रूग्णालयामध्ये उपचाराचा सारा खर्च करावा अशी मागणी केली आहे.

वाचा – हुंड्यासाठी डॉक्टर पतीने पत्नीच्या शरीरात सोडले HIV विषाणू

कसा आला प्रकार समोर

३ डिसेंबर रोजी महिलेला HIV बाधित रक्त दिलं गेलं. ज्यावेळी रक्तदात्यानं सरकारी पेढीमध्ये रक्तदान केलं त्यावेळी त्याला HIVबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही. पण, ज्यावेळी त्यानं परदेशातील नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यासाठी मेडिकल चेकअप केलं गेलं तेव्हा त्याला आपण HIV बाधित असल्याचं कळलं. त्यानंतर त्यानं त्वरित सरकारी रूग्णालयाला माहिती दिली. पण तोवर खूप उशीर झाला होता. HIVबाधित रक्त एका महिलेला दिलं गेलं होतं. एका संस्थेनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये सदर व्यक्तिनं रक्तदानं केलं होतं.

- Advertisement -

वाचा – HIV एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय सापडला?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -