घरदेश-विदेशएनआयएचे १६ ठिकाणी छापे; ५ जण ताब्यात; इसिसचा कट उधळला

एनआयएचे १६ ठिकाणी छापे; ५ जण ताब्यात; इसिसचा कट उधळला

Subscribe

एनआयए आणि एटीएसने १६ ठिकाणी छापे टाकत आयसिसचा मोठा कट उधळला असून याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय तसाप संस्थेने (एनआयए) दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील विविध १६ ठिकाणी छापे टाकून इसिस या दहशतवाही संघटनेचा मोठा कट उधळण्यात एनआयएला यश आले आहे. दहशतवादी संघटनेच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दहशतवादी कृत्य करण्याचा कट

राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींचा दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या ठिकाणी टाकण्यात आले छापे

दिल्लीतील जाफराबाद आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील विविध १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात एनआयए आणि एटीएसने यांनी संयुक्त कारवाई केली आहे. या छाप्यात आयसिसचे नवे मॉड्यूल हरकत – उल – हर्ब – इस्लामचा खुलासा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर अमरोहा येथील सैदपूरमधील इम्मा गावातही एका ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.

- Advertisement -


वाचा – दहशतवादी हल्ल्यात जवानाचा मृत्यू; हे कधी थांबणार?

वाचा – ‘हैदर’ चित्रपटातला तो कलाकार बनला दहशतवादी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -