घरदेश-विदेशवर्षभरात भाजपाला किती वर्गणी मिळाली? ECने जाहीर केली कोट्यवधींची आकडेवारी

वर्षभरात भाजपाला किती वर्गणी मिळाली? ECने जाहीर केली कोट्यवधींची आकडेवारी

Subscribe

नवी दिल्ली – पक्षासाठी वर्गणी (Donation) गोळा करण्यात भाजपाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. २०२१-२२ या सालात भाजपाने वर्गणीतून तब्बल ६१४.५३ कोटी रुपये जमा केले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) नुकताच याबाबत तपशील सादर केला आहे. तर, काँग्रेसला ९५.४६ कोटी रुपये वर्गणी मिळाली. म्हणजेच, भाजपाला काँग्रेसपेक्षा सहापट अधिक वर्गणी मिळाली. भाजापाला मिळालेल्या लोकवर्गणीचा आकडा ऐकताच अनेकांचे डोळे पांढरे पडले आहेत.

हेही वाचा – अल्पसंख्य समाजासाठी भारत उत्तम देश, अहवालातून बाब समोर

- Advertisement -

२० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे जेव्हा वर्गणीरुपात पक्षाला मिळातात तेव्हा याची माहिती निवडणूक आयोगाला देणे पक्षाला बंधनकारक असते. त्यानुसार, प्राप्त झालेली माहिती निवडणूक आयोगाने सादर केली आहे. देशातील चार पक्षांना मिळालेल्या वर्गणीची ताजी आकडेवारीच निवडणूक आयोगाने सादर केली आहे.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला पक्षाला अवघे ४३ लाख रुपये मिळाले आहेत. तर, माकपाला १०.५ कोटी रुपयांची धनराशी प्राप्त झाली. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तारुढ असलेल्या आम आदमी पक्षाला २०२१-२२ दरम्यान ४४.४५ कोटींची धनराशी वर्गणी म्हणून मिळाली. दिल्ली, पंजाब आणि गोवा या तीनच राज्यात आम आदमी पक्ष मान्यता प्राप्त पक्ष म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

हेही वाचा माझी तुलना शूर्पणखाशी केली, रेणुका चौधरी यांच्या दाव्यावरून नेटिझन्स आक्रमक

२०२०-२१ या सालात भाजपाला ४७७.५ कोटी रुपये वर्गणीच्या रुपात मिळाले होते. तर, काँग्रेसला ७४.५० कोटी रुपये वर्गणी मिळाली होती. तर, आता यात तब्बल २०० कोटींची वाढ होऊन भाजपाला ६१४.५३ कोटी रुपये वर्गणी मिळाली आहे.

कोणाला किती मिळाले?

  • भाजपा- 614.53 कोटी रुपये
  • कांग्रेस- 95.46 कोटी रुपये
  • आम आदमी पार्टी- 44.45 कोटी
  • माकपा- 10.05 कोटी रुपये
  • टीएमसी- 43 लाख रुपये

हेही वाचा – Gujarat Election 2022 : उद्या पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान, 788 उमेदवार रिंगणात

गेल्या आठ वर्षांपासून भाजपाची केंद्रात सत्ता आहे. तर, अनेक राज्यातही भाजपाचंच सरकार आहे. त्यामुळे हे डबल इंजिन सरकार वर्गणी गोळा करण्यातही एक नंबरवर आहे. गेल्या सात वर्षांपासून वर्गणी गोळ्या करण्यात भापजा आघाडीवर आहे. एकूण संपत्तीच्या क्रमवारीत भाजपानंतर काँग्रेस, बसपा, सीपीआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा क्रमांक लागतो.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -