घरदेश-विदेशगर्भवती महिलांसाठी कोरोनाविरोधी लस कितपत सुरक्षित? नव्या गाईडलाईन्स जाहीर

गर्भवती महिलांसाठी कोरोनाविरोधी लस कितपत सुरक्षित? नव्या गाईडलाईन्स जाहीर

Subscribe

कोव्हिड 19 पासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी त्यांनी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे तसेच त्यांनी  डॉक्टरांच्या सल्यानूसार कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण करणे देखिल आवश्यक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांच्या कोव्हिड -19 लसिकरणा संबधीत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत आणि म्हंटले आहे की गर्भधारणेमेध्ये संसर्गाचा धोका वाढत नाही. अनेक गर्भवती स्त्रियांना आजाराची लक्षणे नसतील किंवा त्यांना सौम्य आजार असेल परंतु त्यांचे आरोग्य वेगाने खालावू शकेल आणि याचा परिणाम गर्भावरही होण्याची शक्यता आहे. कोव्हिड 19 पासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी त्यांनी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे तसेच त्यांनी  डॉक्टरांच्या सल्यानूसार कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण करणे देखिल आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. गर्भवती महिलांनीसुकद्‌धा लसीकरण करण्यास पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मंत्रालयाने सांगितले की सध्या मार्केटमध्ये शासनाने जी कोव्हिड -19 लस लोकांच्या वापरासाठी आणली आहे ती गर्भवती महिलांसाठी देखिल सुरक्षित आहे. तसेच लसीकरण केल्याने गर्भवती महिलांना कोव्हिड 19 च्या आजारापासून संरक्षण करते. कोणत्याही सामान्या औषधाप्रमाणे, लसीचे काही साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतात जे सामान्यतः सौम्य प्रमाणात असतात. इंजेक्शन मारल्यानंतर एखाद्या व्यक्तीला किंवा गर्भवती महिलेला हलका ताप येऊ शकतो, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होऊ शकते किंवा 1-3 दिवस अस्वस्थ वाटू शकते. गर्भ आणि मुलासाठी लसीचे दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम आणि सुरक्षितता याबाबत अद्याप आढळून आले नाहीये. मंत्रालयाने म्हंटले आहे की, कोव्हिड -19 लसीकरणानंतर दुर्मिळ प्रमाणात गर्भवती स्त्रियांना काही लक्षणे २० दिवसांच्या आत येऊ शकतात जर हि लक्षणे आढळून आल्यास त्वरित लक्ष द्यावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल, असे मंत्रालयाने म्हंटले आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की जर एखाद्या गर्भवती महिलेला विषाणूची लागण झाली तर त्यातील 9० टक्के महिला रुग्णालयात भरती न करताच बरे झाल्या आहेत, तसेच याच्या विरुद्ध काही दिवसातच त्यांच्या आरोग्यामध्ये तीव्र बिघाड होऊ शकतो. त्यामध्ये असे म्हटले आहे की मूलभूत वैद्यकीय परिस्थिती असलेल्या उदा. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, 35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये कोरोना व्हायरसमुळे गंभीर आजाराचा धोका जास्त असतो. इतकेच नाही तर लक्षणात्मक गर्भवती महिलांना गंभीर रोग आणि मृत्यूचा धोका वाढल्याचे दिसून येते. गंभीर रोग झाल्यास इतर सर्व रूग्णांप्रमाणेच गर्भवती महिलांनाही रुग्णालयात दाखल करावे लागेल.

- Advertisement -

हे हि वाचा – एकाच महिलेला तीन वेळेस डोस दिल्याचा आरोप


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -