घरताज्या घडामोडीकोरोना काळात PFदेणार आर्थिक साथ,असे काढू शकता पीएफ खात्यातून पैसे

कोरोना काळात PFदेणार आर्थिक साथ,असे काढू शकता पीएफ खात्यातून पैसे

Subscribe

कोरोनाची सद्य परिस्थितीत कुटुंबातील कोणीही आजारी पडले तर त्याच्या औषधोपचारासाठी EPF खात्यातून पैसे काढता येणार आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळे त्याचे होणारे परिणामही तितकेच गंभीर आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील लोकांची परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. कोरोना काळात आर्थिक साथ देण्यासाठी EPF (Employees’ Provident Fund Organisation) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी लोकांच्या आर्थिक मदतीला धावून येणार आहे. EPF खातेधारक कोरोनाच्या संकट काळात आर्थिक गरज असताना खात्यातून पैसे काढू शकतात. कोरोनाची सद्य परिस्थितीत कुटुंबातील कोणीही आजारी पडले तर त्याच्या औषधोपचारासाठी किंवा अन्य कोणत्याही गरजेच्या वेळी EPF खात्यातून पैसे काढता येणार आहे.

EPF खात्यातून पैसे कसे काढायचे?

ईपीएफमधील पैसे काढण्यासाठी तुम्हाला ईपीएफच्या ऑफिसला जाण्याची गरज नाही. घरबलसल्या तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकता. ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी काही सोप्या स्टेप्स

- Advertisement -
  • पहिल्यांदा https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तिथे तुमचा UAN नंबर (Universal Account Number), पासर्वड आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर manage या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या ईपीएफ खात्याचे KYC झाले आहे याची माहिती तुम्हाला मिळवावी लागेल.
  • तुमचा KYC अपडेट केलेला असेल तर Online service या पर्यायावर क्लिक करुन Claim या पर्यायावर क्लिक करा. तिथे दिलेली संपूर्ण माहिती भरावी. संपूर्ण Claim भरुन झाल्यानंतर Claim submit करण्यासाठी Procced for Online claim या पर्यायावर क्लिक करा.

EPFखात्यातून पैसे काढण्यासाठी आवश्यक गोष्टी

  • ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे UAN(Universal Account Number) नंबर असणे गरजेचे आहे. तुमचे EPF खाते तुमच्या बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • खात्यातून पैसे काढण्यासाठी दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वडिलांचे नाव आणि खातेधारकाची जन्मतारिख जुळणे महत्त्वाचे आहे.

पीएफ अकाउंटमधून मेडिकल, एखादी एमजन्सी, घर बांधणे, मुलांची लग्ने, होम लोन अशा विविध कारणांसाठी ९० टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकता.


हेही वाचा – माध्यम स्वातंत्र्यात भारत १४२ व्या स्थानी, या वाईट स्थितीसाठी आपण सगळे जबाबदार – जितेंद्र आव्हाड

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -