घरताज्या घडामोडीसंतापजनक! महिलेवर १३९ जणांनी केला बलात्कार, ४२ पानी FIR दाखल!

संतापजनक! महिलेवर १३९ जणांनी केला बलात्कार, ४२ पानी FIR दाखल!

Subscribe

सध्या अनेक संतापजनक घटना समोर येत आहेत. शुक्रवारी एका महिलेने गेल्या अनेक वर्षांत तब्बल १३९ लोकांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४२ पानांचे एफआयआर दाखल केले आहे. ही संतापजनक घटना तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये घडली आहे. याप्रकरणात काही महिलांचा देखील समावेश आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

२५ वर्षीय महिलेच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये १३९ लोकांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याची माहिती तिने पोलिसांनी दिली आहे. २०१० मध्ये लग्नाच्या एका वर्षाच्या आत पीडित महिलेचा घटस्फोट झाला. लग्नानंतर महिलेवर पतीने आणि सासरच्यांनी देखील लैंगिक अत्याचार आणि मारहाण केली. त्यामुळे तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र तिथे सुद्धा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या आरोपींमध्ये तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती असल्याचे तक्रारीत नोंदवण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून ही माहिला लैंगिक अत्याचारची शिकार बनली आहे. पण पहिल्यांदाच तिने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी ४२ पानांची एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप काही आरोपींवर महिलेने केला आहे. या सर्व आरोपींची पोलीस चौकशी करणार आहेत. सध्या पीडित महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.


हेही वाचा – माय-लेकिचा एकच बॉयफ्रेंड; प्रेमासाठी आईने काढला लेकीचा काटा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -