माय-लेकिचा एकच बॉयफ्रेंड; प्रेमासाठी आईने काढला लेकीचा काटा!

up daughter murder by the mother along with the lovers
माय-लेकिचा एकच बॉयफ्रेंड; प्रेमासाठी आईने काढला लेकीचा काटा!

एका आईने आपल्या प्रियकरांसोबत पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील सुभाष नगर परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

या घटनेची माहिती पोलिस स्टेशनला सुभाष नगर येथील रहिवासी अब्दुल मतीम यांनी दिली. अब्दुल यांनी पोलिसांना कळवले की, ‘रात्री तीन वाजल्याच्या सुमारास दोन अज्ञान व्यक्तींनी त्यांची मुलगी उसमा हिची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या आईला मुकिस बानोला धारदार शस्त्राने जखमी केले.’ यानंतर आरोपींवर सुभाष नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेसाठी बरेलीचे पोलीस अधिकारी शैलेश कुमार पांडे यांनी चौकशीसाठी एक पथक स्थापन केले. त्याच्या नेतृत्वाखाली या पथकाने अवघ्या तीन तासांत या हत्याचा खुलासा केला आणि आरोपी मृत मुलीची आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

यानंतर प्रियकर कौशरने सांगितले की, ‘मृत मुलीची आई मुकिस बानोसोबत त्याने उसमाची हत्या केली. मुकिस बानोसोबत कौशरचे अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी मृत उसमा सोबत देखील आरोपी कौशरचे अनैतिक संबंध होते, जे त्याच्या पत्नीला समजले होते.’

पोलिसांच्या माहितीनुसार, ‘आरोपी कौशरचे आधीच लग्न झाले होते. त्याला तीन मुलं आहेत. मृत मुलगी उसमा आरोपी कौशरवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, पण कौशरला लग्न करायचे नव्हते. त्यानंतर कौशरने उसमाच्या आईसोबत मिळून कट रचला आणि मग दोघांनी मिळून उसमा हिचा गळा दाबून हत्या केली.

हत्येनंतर केला असा प्लॅन?

पण हत्या केल्यानंतर कौशरने मुकिस बानोला सांगितले होते की, ‘याबाबत पोलिसांनी तुला काही विचारल्यास उसमाची हत्या करण्यासाठी तीन लोक आले होते असे सांगायचे. तसेच या हत्येचा आरोप अज्ञात व्यक्तीवर लावण्याकरिता, मुकिस बानोचा गळा चाकूने कापला आणि डाव्या हाताच्या बोटालाही कापले. यामुळे रस्त्यातील कटा दूर होईल आणि आपल्या दोघातील संबंध कायम राहतील तसेच आपण यातून वाचू.’ या घटनेमुळे लोक हैराण झाले. ज्या आईने आपल्या मुलीला लहानपणापासून आपल्या हृदयाशी धरून ठेवले होते, तिने स्वतःच्या मुलीची हत्या करून स्वतःचे हात लाल केले. सध्या पोलिसांनी या दोघांनी तुरुंगात पाठवले आहे.


हेही वाचा – देव तारी त्याला कोण मारी, १८ व्या मजल्यावरून पडूनही चिमुकला बचावला